नवी मुंबई, दि.15 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिन आज कोकण भवन येथे साजरा झाला. यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त लोकेश चंद्र यांच्या हस्ते कोकण भवन प्रांगणात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण झाले.
या समारंभाप्रसंगी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात ठेवून केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व तसेच आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनेनुसार सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय पोशाखासह मास्क परिधान केले होते. या सोहळ्याचा नागरिकांना घरबसल्या आनंद घेता यावा. यासाठी विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग या कार्यालयाच्या फेसबुक अकाऊंटवरून थेट प्रेक्षपण करण्यात आले.
यावेळी नवी मुंबई पोलीस पथक, यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपायुक्त सर्वश्री सिध्दाराम सालीमठ, मनोज रानडे, मनोज गोहाड, गिरीश भालेराव, वैशाली चव्हाण, पंकज देवरे, सुप्रभा अग्रवाल, सहायक आयुक्त विनोद खिरोळकर, मनिषा देवगुणे, नारायणसिंग परदेशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, सहसंचालक (लेखा) सिताराम काळे, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाजी गिते यांनी केले.