मुंबई, दि.१५ : विधान भवन, मुंबई येथे आज स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेन्द्र भागवत, सभापती यांचे सचिव महेंद्र काज, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.