दि.९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शासनाने घेतलेले निर्णय आणि घडामोडींचा संक्षिप्त आढावा
कोरोना युद्ध
९ ऑगस्ट २०२०
- बरे झालेल्या १३ हजार ३४८ रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंतची सर्वोच्च संख्या. आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे. नवीन निदान झालेले रुग्ण- १२ हजार २४८, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के . सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू. आज ७८ हजार ७० चाचण्या पूर्ण, नोंद झालेले मृत्यू- ३९०.
- महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न, उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड जाहीर, स्टार्टअप्सना १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश मिळणार असल्याची कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती.
- कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध. दीक्षा ॲपव्दारे दररोज इयत्ता व विषयनिहाय ई- साहित्य अभ्यासमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची सुविधा. ऑफलाइनची सुविधा सुध्दा उपलब्ध. घरपोच पाठ्यपुस्तकांचे वितरण.
- २० जुलै, २०२० पासून सह्याद्री वाहिनीवर एमकेसीएल फाउंडेशन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत इयत्ता १ ली ते ८ वी साठी आनंददायी शिक्षण.
- दुर्गम भाग व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे किंवा नाही अशा ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षण सुरु.
१० ऑगस्ट २०२०
- आज बरे झालेल्या ६७११ रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के. आज ९,१८१ नवीन रुग्णांचे निदान, , सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु . आज२९३ करोनाबाधितरुग्णांच्यामृत्यूंचीनोंद. मृत्यूदर३.४४ टक्के
- लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन 13 ऑगस्टपासून शिथिल तर 17 ऑगस्ट पासून पूर्णपणे उठणार असल्याची वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
- २२ मार्च ते ९ ऑगस्ट पर्यंत २,२५,३८० गुन्ह्यांची नोंद, ३३,११७ व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी १९ कोटी ८८ लाख ०५ हजार ३५ ४ रु. दंडाची आकारणी.
- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगावराजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित. या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे अनुक्रमे 100 व 20 खाटांची सोय उपलब्ध.
११ ऑगस्ट २०२०
- २२ मार्च ते १० ऑगस्ट पर्यंत कलम १८८ नुसार २, २५ ,९०७ गुन्ह्यांची नोंद, ३३,१९० व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी १९ कोटी ९९ लाख ७३ हजार ८०४ रु. दंडाची आकारणी.
- प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे आणि गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. ठळक मुद्दे- कोरोना बाधित आणि मृत्यू झालेले एकही प्रकरण महाराष्ट्राने लपवले नाही, मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न, मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक, कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी सर्वोच्च प्राधान्य. याकाळात शिवभोजन योजनेव्दारे दर महिन्यात लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय, कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालक व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय, कोरोनानंतरचे उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज, महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार, इम्युनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज, विषांणुचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय आवश्यक, राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह साडेतीन लाख खाटा उपलब्ध,
- आज बऱ्या झालेल्या १० हजार १४ रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ रुग्ण बरे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के. आज ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ॲक्टिव्ह रुग्ण. आज २५६ मृत्यूंची नोंद. मृत्यूदर ३.४२ %. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह, १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाइन, ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन.
१२ ऑगस्ट २०२०
- आज बरे झालेल्या १३ हजार ४०८ रुग्णांची घरी रवानगी. ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या. एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे, आज १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के, सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू, आज नोंद झालेले मृत्यू – ३४४.
- खुल्या प्रवर्गातील वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
- राज्यातील वैद्यकीय व दंत महाविद्यालयात कार्यरत निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा दहा हजार रुपयांची 1 मे 2020 पासून वाढ करण्याचा निर्णय.
- कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करण्याची, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे मागणी.
- कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय. मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के आकराले जाणारे शुल्क अभय योजनेअंतर्गत माफ.
- कोविड पार्श्वभूमीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा वसतीगृह संचालक संघासोबत बैठक. यावेळी खासदार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मागासवर्ग, बहुजन समाज कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, खा.श्री शरद पवार उपस्थित. आश्रमशाळातील सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉइड मोबाइल फोन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात शासकीय उपाययोजनेबाबत बैठकीत चर्चा.
- राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे सुधारीत दर जाहीर, आधिच्या दरात प्रति तपासणी ३०० रुपये कमी. सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि नमुन्याच्या अहवालाकरिता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये दर, स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाइन सेंटरमधून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० रु. दर, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये दर.
मंत्रिमंडळ निर्णय
- कोविड विषाणुमुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने आर्थिक विवंचनेतील आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय, सुमारे 11.55 लाख आदिवासी लाभार्थींना याचा फायदा. या योजनेत एकूण 4 हजार रुपये कुटुंब अनुदान. ज्यामध्ये 2 हजार रुपये किंमतीच्या वस्तू आणि 2 हजार रुपये रोख रक्कम बँक खात्यात जमा, यासाठी 486 कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता.
- प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय.
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 500 कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय.
१३ ऑगस्ट २०२०
- बऱ्या झालेल्या ९११५ रुग्णांची घरी रवानगी. एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के . ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू – ४१३
- उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काजू व्यावसायिकांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक, उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित, काजू व्यावसायिकांना राज्याच्या जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती; मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कम परत देण्याचा श्री पवार यांचा निर्णय.
- ‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी 23 लाख 9 हजारांचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.
- आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी २०२० – २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून आता २८ ऑगस्ट पर्यंत करण्यात आल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती.
- विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर 2020 रोजी होणारी परीक्षा आता सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्याचा निर्णय.
१४ ऑगस्ट २०२०
- आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना पाच किलो मोफत तांदूळ व एक किलो अख्खा चना वाटप करण्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य आणि बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याचा कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा निर्णय. यामुळे १० लाख बांधकाम कामगार लाभान्वित. यासाठी मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च.
- कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांच्या विमा कवचाची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती. प्रस्तावास एका दिवसात मंजुरी.
- सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्यामार्फत घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा कोविड 19 मुळे अनिश्चित काळासाठी स्थगीत.
- २२ मार्च ते १३ ऑगस्टपर्यंत २, २८ ,०७६ गुन्ह्यांची नोंद, ३३,३५९ व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी २० कोटी ६२ लाख ५३ हजार ४९४ रु. दंडाची आकारणी, अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ४३ हजार ४८४ पासेसचे वितरण.
- भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयू प्रकल्पाचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ, यामुळे अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा उपलब्ध. अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच कार्यान्वित.
- बऱ्या झालेल्या १० हजार ४८४ रुग्णांची घरी रवानगी. एकूण ४ लाख १ हजार ४४२ रुग्ण बरे. रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के . आज १२ हजार ६०८ नविन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवरउपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू- ३६४.
१५ ऑगस्ट २०२०
- बरे होऊन घरी रवानगी केलेले रुग्ण- ६८४४. आतापावेतो ४ लाख ८ हजार २८६ रुग्ण बरे. बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान. सध्या १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू- ३२२.
इतर निर्णय व घडामोडी
९ ऑगस्ट २०२०
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी आणि वनमंत्री श्री संजय राठोड यांच्याद्वारे शुभेच्छा.
- उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा.
- जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दशरथ मारुती पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याद्वारे दु:ख व्यक्त.
- महाराष्ट्र सायबर विभागात इंटर्नशीपची संधी, संपर्क- Twitter@MahaCyber1 / The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005
१० ऑगस्ट २०२०
- मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाबाबत सूचना निर्गमित, प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार असल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
- राज्यातील पूरस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा, आपत्ती निवारण व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची श्री ठाकरे यांची मागणी. ठळक मुद्दे- निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ६५ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान, ५ ऑगस्ट २०२० रोजी वादळासह पडलेल्या पावसामुळे मुंबईत अंदाजे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान, त्यामुळे राज्याला लवकरात लवकर मदत आवश्यक. केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाची जागा मुंबई महानगर पालिकेस हस्तांतरीत केल्यास माहूल पंपिंग स्टेशनच्या उभारणीच्या कामाला गती येणे शक्य. यामुळे हिंदमाता, दादर, वडाळा या भागातील पावसाचे मोठ्याप्रमाणात साचणारे पाणी बाहेर काढणे शक्य. नदीकाठी पुररेषेच्या आत राहणाऱ्या मानवी वस्त्या शोधून तेथील नागरिकांना इतरत्र हलवण्याची, योग्य जागी त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज. मराठवाड्याच्या हवामान अंदाजासाठी औरंगाबाद येथे स्वतंत्र ३ x डॉपलर रडार उभारणीची मागणी.
११ ऑगस्ट २०२०
- गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे , ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश.
- पर्यावरण प्रभाव मूल्यांकन मसुद्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांना विनंती.
- विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री यांना विनंती.
१२ ऑगस्ट २०२०
- दिनांक १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत अवयवदान करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांनी ‘अवयवदान जनजागृती सप्ताह‘ आयोजित करण्याची राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांची विद्यापीठांना सूचना.
- उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर, महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश.
- पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित. महत्वाचे मुद्दे – दूध भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कठोर कारवाई, प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे निर्देश, क्षेत्रीय पातळीवर जाऊन दुधाचे नमुने तपासणार.
- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक. महत्वाचे मुद्दे– रंगवैखरी नाट्याविष्कार स्पर्धेचे दरवर्षी आयोजन, मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्याचे श्राव्य पुस्तक (बोलक्या पुस्तकांना) योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यास मान्यता, दुसऱ्या टप्प्यात ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा यांचे मान्यवर कलावंतांकडून बोलक्या पुस्तकात रूपांतर. “सिंधुदुर्गातील रानभाज्या” या पुस्तकाला अर्थसहाय्य, मराठी विकास संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध आस्थापनांमधील अमराठी भाषकांसाठी असलेल्या मराठी प्रशिक्षण वर्गाच्या संख्येत वाढ. सीबीएससी व आयसीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा सुलभ संदर्भसाहित्याची निर्मिती, अमराठी भाषकांना उपयुक्त ठरलेल्या “मायमराठी” पाठ्यक्रमांसारखे नवीन उपक्रम,मराठी भाषा-साहित्य-संस्कृती याविषयांवर मुंबई दूरदर्शनवरून प्रदर्शित कार्यक्रम दूरदर्शनच्या सहकार्याने संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, महाराष्ट्रातील ९ विद्यापीठांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील लोककलांचे डिजिटायजेशन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार, मराठी साहित्यक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांपैकी निवडक साहित्यिकांच्या गावी अथवा जिथे त्यांची स्मारके आहेत अशा ठिकाणी भाषा-साहित्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन, कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने सार्वजनिक तसेच वैयक्तिक आरोग्य साक्षरता वाढण्यास साहाय्यभूत ठरेल अशा सुलभ साहित्याची मराठीतून निर्मिती.
मंत्रिमंडळ निर्णय
- उपकरप्राप्त इमारतीतील लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय, या सुधारणेनुसार अर्धवट अवस्थेतील अथवा कुठलेही काम सुरु नसलेले प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतल्यावर त्यासाठी आरंभ प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत भाडेकरु/रहिवाशी यांचे पुनर्रचित गाळे पूर्ण करुन देणे म्हाडास बंधनकारक. या निर्णयामुळे 14500 उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना फायदा.
- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मुचकुंदी लघुपाटबंधारे योजनेच्या 290 कोटी 30 लाख रुपये किंमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता.
१३ ऑगस्ट २०२०
- आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.
- उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियानाचे राज्यपाल श्री भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते उद्घाटन.
- कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची माहिती.
- तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्यामार्फत रायगड जिल्हा पोलीस अधिक्षकांना निर्देश.
- कांदीवली येथील शिपोंली क्रीडा संकुलाच्या बांधकामाला तत्काळ सुरुवात करण्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे निर्देश.
- पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषामंत्री श्री. सुभाष देसाई, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री. सुनील केदार, सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे, राजशिष्टाचार राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे, राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे उपस्थित. वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करुन योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या नावावर चर्चा.
१४ ऑगस्ट २०२०
- राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत अभिनंदन. उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर.
- माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
- पैलवान खाशाबा जाधव यांना,स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.
- माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
- पैलवान खाशाबा जाधव यांना,स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.
15 ऑगस्ट 2020
- स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठळक मुद्दे– आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 150 टेस्टिंग लॅब सुरू, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 29 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 980 कोटी रुपये रक्कम खात्यावर जमा करून त्यांची कर्जमुक्ती. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे 418 लाख क्विंटल यावर्षी कापूस खरेदी.रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू. ऑनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. सर्व प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर सध्या सुमारे 50 ते 60 हजार उद्योग सुरू. उद्योगक्षेत्रात 12 देशांमधील गुंतवणूकदारांसोबत सुमारे 16 हजार कोटीं रुपयांचे सामंजस्य करार. देशात प्रथमच तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती. जिल्ह्यातील डॉक्टरांचे सुद्धा टास्क फोर्स तयार. गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या, कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेकिंग , ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटला वेग. जिल्ह्याजिल्ह्यात रुग्ण सुविधांची उभारणी वेगाने सुरू. साडेचार कोटी लिटर दुधाचे भुकटीत रूपांतर. आदिवासी मुले व महिलांना ही दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली आदिवासी खावटी योजना सुरू, 100 टक्के अनुदान म्हणून 2 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू.
- स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण, श्रीमती रश्मी ठाकरे यांच्यामार्फत राष्ट्रध्वजास मानवंदना.
- स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश श्री दिपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण.
- स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित.
- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त कोविड योद्ध्यांचा पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सन्मान.
- मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.
०००