‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात शुक्रवारी मुलाखतीचे प्रसारण
मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ आणि ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘स्वच्छ व सुंदर नवी मुंबई महानगरपालिका‘ या विषयावर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होईल. तर ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात गुरुवार दि. २७आणि शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवरही प्रसारित होणार आहे. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेमध्ये देशात मिळवलेले सातवे स्थान, महापालिकेला मिळालेला ओडीएफ प्लस प्लस हा दर्जा, महापालिका क्षेत्रात कचऱ्याचे संकलन व वर्गीकरणावर सुरू असलेले काम, स्वच्छता उपक्रमाला नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद, प्लास्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, स्वच्छ सर्वेक्षण या उपक्रमाचे सातत्य, महापालिकेने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली आहे.