राज्यसभेतील महाराष्ट्राच्या ७ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

0
7

नवी दिल्ली,दि.25 :राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या7जागांसाठी26मार्च2020रोजीनिवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर होणार आहे.

संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्याराज्यसभेत एकूण17राज्यांतील55सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल2020 (2,9आणि12एप्रिल) मध्ये  संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण7सदस्यांचा कार्यकाळ2एप्रिल2020ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या55जागांसाठी आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा असेनिवडणूक कार्यक्रम

महाराष्ट्रासह17राज्यांच्या राज्यसभेतील55जागांसाठी26  मार्च2020ला मतदान घेण्यात येणार आहे.6मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख13मार्च असून16मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल.  18मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर  26मार्चला सकाळी9ते  दुपारी  4वाजेपर्यंतमतदान घेण्यात येईल आणि सायंकाळी5वाजता  मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.

*****

रितेश भुयार /वृत विशेष क्र.42 /दि.25.02.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here