‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

0
9

परभणी, दि. 18 :-   कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहिम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला असून जिल्ह्यात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल आणि सर्व संशयित कोविड-19 रुग्ण आणि कोमॉर्बीड व्यक्ती यांना तपासणी, चाचणी व उपचार या सेवा तत्पर मिळण्यासाठी व  कोविड-19 नियंत्रणासाठी, तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्ह्यात “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” मोहिमेबाबत बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त देविदास पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजूषा मुथा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले, जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” मोहीम राबविण्यात येणार असून प्रत्यक्ष गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात येणार आहेत. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी व 2 स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक तसेच यामध्ये स्वयंसेवी संस्थानाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. एक पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करुन ताप, खोकला, दम लागणे अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची कोविड-19 अँटीजेन टेस्ट करुन पुढील उपचार केले जाणार आहेत. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समाजावून सांगण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस महसूल, आरोग्य, महापालिकासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here