विधानभवनातील सुरक्षा व्यवस्था अद्ययावत करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

0
8

मुंबई, दि. 24 : विधिमंडळाचे कामकाज फक्त अधिवेशनापुरते नाही तर वर्षभर सुरु असते. त्यामुळे कामासाठी अनेक लोक विधानभवनात येत असल्याने येत्या काळात विधानभवनातील सुरक्षा व्यवस्था अद्ययावत करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिले.

विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे सुरक्षाविषयक उपकरण बसविण्यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी विधानभवनातील संबधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. पटोले म्हणाले, विधानभवनात सुरक्षारक्षक तैनात असतात. पण काळानुरुप अद्ययावत सुरक्षा व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यावर येत्या काळात भर देण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरा, कॅम्पाऊंड वॉल, फायरवॉल, फायरप्रुफ यंत्रणा, मोटार स्कॅनिंग सिस्टीम अशी अद्ययावत यंत्रणा विधानभवनात असण्यावर भर देण्यात येणार असल्याने विधानभवनातील संबंधित यंत्रणेने हे काम प्राधान्याने सुरु होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरु करावी, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/24.2.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here