मुंबई, दि. 23 -भारतीय मुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल टेकनोव्हा इमेजिंग सिस्टिम्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रणव पारिख यांनाराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्तेमुंबई मुद्रक संघाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यपालश्री.कोश्यारी यांच्या हस्ते पारिख यांनाकालहा पुरस्कार विले पार्ले येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला परमार्थ निकेतन आश्रम हृषीकेश येथील साध्वी भगवती सरस्वती,मुंबई मुद्रक संघाचे अध्यक्ष तुषार धोटे,जीवनगौरव पुरस्कार समितीचे निमंत्रक आनंद लिमये,श्रीमती सलोमी पारिख आदींसह मुद्रण व्यवसायातील अनेक मान्यवर उपस्थित होते.