Ø नाव : श्री. दत्तात्रय विठोबा भरणे
Ø जन्म : 1 जून, 1968
Ø जन्म ठिकाण : अंथुर्णे
Ø शिक्षण : बी.कॉम.
Ø ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी.
Ø वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सारिका.
Ø अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा)
Ø व्यवसाय : शेती
Ø पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Ø मतदारसंघ : 200-इंदापूर
Ø इतर माहिती : 1992 पासून संचालक, 2003-2008 चेअरमन , श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, इंदापूर; 1996 पासून संचालक, 2002-2003 चेअरमन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; 1991-99 काँग्रेस पक्षाचे कार्य 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; 2012-14 सदस्य व मार्च 2012 ते सप्टेंबर 2014 अध्यक्ष, जिल्हापरिषद, पुणे; या काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल समाज कल्याण विभागाचा 2013 चा “अपंग कल्याण राज्य पुरस्कार” प्राप्त; 2014-19 सदस्य महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
संदर्भ: 12 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय