मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात ‘सहज व सुलभ तत्पर सेवा‘ या विषयावर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०१९, बुधवार दि. १ जानेवारी आणि गुरुवार दि. २ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजूमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग यंत्रणेची कार्यप्रणाली, नागरिकांना कामामध्ये सुलभता यावी याकरिता सुरू असलेले ई-उपक्रम, नोटीस ऑफ इंटीमेशन म्हणजे काय, बनावट व्यक्तीचा वापर करून दस्त नोंदणी करणे असे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागाने केलेल्या उपाययोजना, मिळकतीचे घरबसल्या मूल्यांकन या विषयाची माहिती श्री.कवडे यांनी ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून दिली आहे.