असा होता आठवडा (दि.22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2019)

0
12

दि. 22 डिसेंबर 2019

• मुंबई येथे केंद्रीय अल्पसंख्याक आयोगामार्फत आयोजित ‘हुनर हाट’ या उपक्रमाचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन.

दि. 23 डिसेंबर 2019

• नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका, राज्यात शांततेचे वातावरण ठेवा, असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.

• बोरिवली (मुंबई) येथील प्रमोद महाजन स्पोर्टस क्लब येथे मुंबई – उत्तराखंड महोत्सवाचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून उद्घाटन.

• आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 50 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द.

• 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘भोंगा’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा पुरस्कार प्रदान. मराठी चित्रपटांना विविध श्रेणीत 10 पुरस्कार.

दि. 24 डिसेंबर 2019

• मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र.

• कर्जमुक्तीबद्दल राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार.

मंत्रिमंडळ निर्णय

• महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या, एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम 2 लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार.

• राज्यातील गरीब व गरजू जनतेला 10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यास मान्यता. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय तसेच प्रत्येक भोजनालयात कमाल 500 थाळी सुरु करणार.

दि. 25 डिसेंबर 2019

• मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेची 43  वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.

दि. 26 डिसेंबर 2019

• मुंबई येथे आदिवासी विकास विभागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. आदिवासी विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वॉर रूमची स्थापना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

• केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या  एनडीएच्या  परीक्षेमध्ये देशात 16 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकवलेल्या पियुष नामदेव थोरवे यांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार.

• राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्यावतिने विविध सामाजिक घटकांच्या एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेला 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महामंडळाचा निर्णय.

• गृहनिर्माण मंत्री श्री जयंत पाटील यांच्याकडून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा.

• पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी लाभार्थींनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे आवाहन.

दि. 27 डिसेंबर 2019

·      गृहमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विधि व न्याय विभाग आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे श्री शिंदे यांचे संबंधितांना निर्देश.

·      मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात  सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक. केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. अवैध फलकांवर कारवाईचे निर्देश. मुंबईत हवा प्रदुषणाबरोबरच दृष्यमानताही कमी होत आहे. यावर उपाय योजण्याची अधिकाऱ्यांना सूचना. उत्कृष्ट काम करणाऱ्या सहायक आयुक्तांचा गौरव करण्याचे सुतोवाच.

· मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते वाहतुकीसाठी सुलभ, सुरक्षित आणि पादचारी उपयोगासाठी सुसह्य व्हावेत यासाठी महापालिकेमार्फत ब्लुमर्ग फिलाँन्थ्रॉपीस्ट आणि डब्लुआरआय इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई स्ट्रिट लॅब” स्पर्धेचे आयोजन. या स्पर्धेतील पाच रस्त्यांच्या आराखड्यांची मुख्यमंत्र्यांकडून  पाहणी.

·      मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुणे मेट्रो कोचचे, मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात अनावरण

दि.28डिसेंबर2019

· ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार विकास सबनीस यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांकडून अंत्यदर्शन आणि कुटुंबीयांचे सांत्वन.

·  बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 50 शाळांना योग शिक्षण देण्याच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमास राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here