बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
मुंबई,दि.27: केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्वआमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त,प्रभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधला. मुंबईतील पदपथ सुंदर करण्यासाठी आयोजित प्रदर्शनास देखील त्यांनी भेट दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई,सुंदर मुंबई उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भातआढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी सहायक आयुक्तांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,मुंबईतील रस्ते,पदपथ,वाहतूक बेटे,उद्याने,मनोरंजन मैदाने,मंडई,शालेय परिसर,आरोग्य,पाणी आदी विविध नागरी सेवा-सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी प्रत्येकाने एक संघ म्हणून काम करावे. यासाठी मुंबईत असलेल्या विविध शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधावा.
अवैध फलकांवर कारवाई आवश्यक
मुंबईत हवा प्रदुषणाबरोबरच दृष्यमानताही कमी होत आहे. यावर उपाय योजण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महानगरपालिकेने जाहिरात फलक धोरण आखावे. तसेच अवैध व विना परवाने फलक लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी. अवैध फलकांना आळा घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांशी स्वतः संवाद साधू,असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या सहायक आयुक्तांचा गौरव करणार
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,शहरामध्ये जागोजागी डेब्रिज,कचरा टाकणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी. तसेच डेब्रिज,कचरा वेळोवेळी उचलण्यात यावा,यासाठी मुंबई डेब्रिजमुक्त व कचरामुक्त करण्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात यावी. तसेच वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करणे,पदपाथ सुव्यवस्थित राखणे,रेलिंग व्यवस्थित ठेवणे,स्थानिक वातावरणात टिकणारी व फुलणारी झाडे लावणे आदी कामांना प्राधान्य द्यावे. तसेच सेवा मार्गावरील भिंती सुशोभित करण्यासाठी मुंबईतील जागतिक दर्जाच्या कलाकारांची मदत घ्यावी. मुंबईतील52पैकी50मंडईच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित दोन मंडईचा विकास करण्यासाठी महापालिकेने लक्ष द्यावे. या सर्व कामांच्या आढाव्यासाठी दर तीन महिन्यांनी सहायक आयुक्तांची बैठक घेण्यात येईल. तसेच चांगले काम करणाऱ्या सहायक आयुक्तांचा या बैठकीत सत्कार करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
मुंबई विकास नियमावलीनुसार विकास होतो की नाही,याकडेही लक्ष देण्यात यावे. विकास हा सर्वांगिण असायला हवा. रस्ते,पदपथ याबरोबरच सेवामार्गावरील हरित पट्टा,उड्डाणपुलाखालील जुनी वाहने काढून तेथील जागांचे सौंदर्यीकरण याकडेही लक्ष द्यायला हवे. नागरिकांना सोयीबरोबरच चांगल्या सुविधा दिल्या तर त्याचा वापर वाढतो. त्यामुळे चांगले पदपाथ दिले तर त्याचा वापर नक्कीच वाढेल. तसेच मुंबईच्या लौकिकात भर पडून मुंबई पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढेल,असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईत या वर्षी पाणी साचणार नाही,यासाठी नाले,पदपथ,गटारे यांची स्वच्छता करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच महानगरपालिकेला येणाऱ्या अडचणी राज्य शासनाच्या निदर्शनास आणल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करावी – एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले की,पदपथ व्यवस्थित नसल्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे महानगरपालिकेने पदपाथाच्या दुरुस्ती व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे. डेब्रिज व माती टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. रस्ते,पदपाथ,वाहतूक बेटे यांचे सौंदर्यीकरणाचे मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्यास त्या सर्व महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येतील.
वाहतूक व्यवस्थापन अभ्यास व्हावा – आमदार आदित्य ठाकरे
श्री.आदित्य ठाकरे म्हणाले की,मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे वाहतूक व्यवस्थापन अभ्यास करणे आवश्यक आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील तसेच शहरातील इतर उड्डाण पुलाखालील जागांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. तसेच सेवा मार्गावर व्हर्टिकल गार्डनची संकल्पना राबविण्यात यावी. मुंबईतील रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या फलकांमधील (होर्डिंग) अंतर ठरविण्यात यावे. तसेच जाहिरात फलकाचे धोरण आखण्यात यावे. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या रस्ते दुरुस्ती व सौंदर्यीकरणाच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यात यावी. शहरात मेट्रोची कामे सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते. पुढील वर्षी पावसाळ्यात पाणी साचू नये,यासाठी नाले,गटारे सफाईवर लक्ष द्यावे.
यावेळी महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डातील सहायक आयुक्तांनी वॉर्डात केलेल्या पदपाथ दुरुस्ती,रस्ते दुरुस्ती,होर्डिंग,बॅनर काढणे,कचरा हटविणे यासंबंधी केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल,आबासाहेब जऱ्हाड,प्रवीण दराडे,सुरेश काकाणी,तसेच सर्व सहआयुक्त,उपायुक्त व संबंधित खातेप्रमुख उपस्थित होते.
मुंबई स्ट्रिट लॅब प्रदर्शनाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते वाहतुकीसाठी सुलभ,सुरक्षित आणि पादचारी उपयोगासाठी सुसह्य व्हावेत असे प्रयत्न आहेत. यासाठी महापालिकेने ब्लुमर्ग फिलाँन्थ्रॉपीस्ट आणि डब्लुआरआय इंडिया यांच्या सहकार्याने रस्ते पुनर्रचनेसाठी एक स्पर्धा घेतली. त्यातून पाच रस्त्यांचे आराखडे तयार करण्यात आले. या आराखड्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली.
‘मुंबई स्ट्रिट लॅब” या स्पर्धेत रस्त्यांची संरचना-संकल्पनेशी निगडीत संरचनाकार-विशारदांनी सहभाग घेतला. यात52संस्थांनी सहभाग नोंदविला. त्यातून15संघांची निवड करण्यात आली. या संघाना शहरातील पाच रस्त्यांच्या पुनर्रचनेसाठी संकल्पना सादर करण्याचे आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम देण्यात आले. या स्पर्धेतून हे रस्ते पादचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले. यात केवळ पाच रस्त्यांवरील सुमारे सत्तर हजार चौरस फूट जागा कोणतेही मोठे फेरबदल न करता मोकळेकरण्यात यश आल्याची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली.
स्पर्धेत यशस्वी संस्था आणि संबंधित रस्ते पुढीलप्रमाणे – विक्रोळी पार्कसाईट रोड क्र.17 -बांद्रा कलेक्टीव्ह रिसर्च अँड डिझाईन फाऊंडेशन,मौलाना शौकत अली रोड – मेड(ई) ईन मुंबई,ई नेपीयन सी रोड – स्टुडिओ पोमग्रेनेट,राजाराम मोहन रॉय रोड – स्टुडिओ इनफिल अॅन्ड डिझाईनशाला कोल्याबरोटिव्ही,एस.व्ही.रोड – प्रसन्न देसाई आर्किटेक्टस. अशाच रितीने मुंबईतील सुमारे दोन हजार किलोमीटर्सचे रस्ते पादचाऱ्यांसाठी सुसह्य आणि सहज चालण्यासाठी मोकळे करण्यात येणार आहेत. यामुळे मोटार वाहतूकही सुरळीत होईल अशा गोष्टींचा समावेश असणार आहे. यात पदपथ खुले करणे,त्यांची रूंदी वाढविणे,दुभाजकांची आणि जोड रस्त्यांसह व्यापारी पेठांतील रस्त्यांची ठेवण सौंदर्यीकरण,यासह बस थांबे,रस्ते यांच्या रचनेत बदल ते सुविधापूर्ण व्हावेत अशा संकल्पना आहेत.
यावेळीनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,आमदार आदित्य ठाकरे,अनिल परब,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी,पोलीस आयुक्त संजय बर्वे,मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव,नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर,प्रधान सचिव मनिषा म्हैसकर,म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
०००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/27.12.2019
केवल कांक्रीटीकरण यानी विकास नहीं केवल स्वच्छता नहीं बल्कि शहरों का व्यक्तित्व बदलना होगा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, ता.27 : केवल स्वच्छता ही नहीं बल्कि शहरों के व्यक्तित्व में बड़ा बदलाव आने चाहिए. मुंबई जैसे विश्वपटल के महानगर का केवल कांक्रीटीकरण न हो बल्कि सौंदर्यीकरण होना चाहिए, ऐसी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त की. आज बृहन्मुंबई महानगरपालिका सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारियों के साथ मुख्यमंत्री ठाकरे ने संवाद किया. मुंबई के पदपथ सुंदर करने के लिए आयोजित प्रदर्शन का भी उन्होंने मुआयना किया.
बृहन्मुंबई महानगरपालिका के स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई उपक्रम के अंतर्गत चलाए जा रहे उपाययोजनाओं के संदर्भ में जायजा बैठक आज सह्याद्री अतिथीगृह में मुख्यमंत्री श्री. ठाकरे की अध्यक्षता में हुई. इस समय उन्होंने सहायक आयुक्तों के साथ संवाद
मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि, मुंबई के रास्ते, पदपथ, यातायात बेट, गार्डन, मनोरंजन मैदान, मार्केट, शालेय परिसर, स्वास्थ्य, पानी आदि विभिन्न नागरी सेवा- सुविधा वैश्विक दर्जा की करने के लिए हर व्यक्ति द्वारा एक संघ के रूप में काम करना चाहिए. इसके लिए मुंबई में कार्यरत विभिन्न सरकारी यंत्रणाओं ने एकत्रित आकर समन्वय साधने का आवाहन भी उन्होंने किया.
अवैध फलकों पर कारवाई आवश्यक
मुंबई में हवा प्रदुषण के साथ साथ रो दृष्यमानता भी कम हो रही है. इसपर उपाययोजन आवश्यक है. इसके लिए महापालिका द्वारा विज्ञापन फलक नीति तैयार करने को ठाकरे ने कहा. तथा अवैध और बिना लाइसेंस के फलक लगाकर शहर का सौंदर्य बिगाड़नेवालों पर कड़ी कार्रवाई करने के आदेश भी उन्होंने दिए. अवैध फलकों पर शिकंजा कसने के लिए सभी राजनीतिक पार्टियों के साथ संवाद करेंगे, ऐसा श्री ठाकरे ने कहा.
उत्कृष्ट काम करनेवाले सहायक आयुक्तों का गौरव करेंगे
मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि, शहरों में जगह जगह पर डेब्रिज, कचरा डालनेवालों के खिलाफ कारवाई करें. तथा डेब्रिज, कचरा समय समय पर उठाया जाए. इसके लिए मुंबई डेब्रिजमुक्त और कचरामुक्त करने के लिए समय सीमा तय की जाए. साथ ही यातायात बेटों का सुशोभिकरण करना, पदपाथ सुव्यवस्थित रखना, रेलिंग व्यवस्थित रखना, स्थानीय वातावरण में टिकनेवाली और बहार आनेवाले पेड़ लगाना आदि कामों को प्राथमिकता दें. तथा सेवा मार्ग पर दीवारें सुशोभित करने के लिए वैश्विक दर्जे के कलाकारों की मदद लें. मुंबई के 52 में से 50 मंडी की दुरुस्ती के काम पूर्ण हुए है. शेष दो मंडी के विकास की ओर महापालिका ध्यान दें. इस सभी कामों का जायजा लेने के लिए हर तीन महीने में सहायक आयुक्तों के साथ बैठक ली जाएगी. तथा अच्छा काम करनेवाले सहायक आयुक्तों का इस बैठक में सत्कार किया जाएगा, ऐसा भी उन्होंने बताया.
डेब्रिज डालनेवालों पर कार्रवाई करें – एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री श्री. शिंदे ने कहा कि, पदपथ व्यवस्थित न होने के कारण सड़क दुर्घटनाओं का प्रमाण बढ़ता है. इसलिए महापालिका द्वारा पदपाथ की दुरुस्ती और सुव्यवस्था की ओर ध्यान देना जरूरी है. डेब्रिज और मिट्टी डालनेवालों पर कड़ी कार्रवाई करें, ऐसा शिंदे ने कहा.
यातायात व्यवस्थापन का अभ्यास हो – विधायक आदित्य ठाकरे
श्री. आदित्य ठाकरे ने कहा, मुंबई में यातायात व्यवस्था का व्यवस्थापन का अभ्यास करना आवश्यक है. पश्चिम द्रुतगती मार्ग पर तथा शहर के अन्य फ्लाइओवर के निचे के जगहों का सौंदर्यीकरण किया जाए. साथ ही सर्विस रोडपर वर्टिकल गार्डनची संकल्पना चलाई जाए. मुंबई के सडकोम पर लगाएं गए होर्डिंग में अंतर तय किया जाए. साथ ही विज्ञापन नीति तैयार करें. शहर में मेट्रो के काम शुरू है. साथ ही कई जगहों पर बारिश में पानी जमा होता है. अगले साल बारिश में पानी जमा न हो, इसके लिए नाला सफाई पर ध्यान दे, ऐसा उन्होंने कहा.
इस समय महानगरपालिका से सभी वार्ड के सहायक आयुक्तों ने वार्डों में किए पदपाथ दुरुस्ती, सड़क दुरुस्ती, होर्डिंग, बॅनर निकालना, कचरा हटाने के संबंधी किए कामों की जानकारी करें. इस समय अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड, प्रवीण दराडे, सुरेश काकाणी तथा सभी सहआयुक्त, उपायुक्त और संबंधित खाताप्रमुख उपस्थित थे.
मुंबई स्ट्रिट लॅब प्रदर्शन का मुख्यमंत्री ने किया मुआयना
मुंबई महापालिका क्षेत्र के रास्ते यातायात के लिए सुलभ, सुरक्षित और पादचारी उपयोग के लिए सुसह्य होने के लिए प्रयास किए गए है. इसके लिए महापालिका ने ब्लुमर्ग फिलाँन्थ्रॉपीस्ट और डब्लुआरआई इंडिया के सहयोग से सड़क पुनर्रचना के लिए एक स्पर्धा आयोजित की. इससे पांच सड़कों के प्रारूप तैयार किए. इन प्रारूपों की जानकारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे को सह्याद्री राज्य अतिथी गृह के प्रदर्शन के माध्यम से दी गई.
‘मुंबई स्ट्रिट लॅब” इस स्पर्धा में सड़कों की संरचना-संकल्पना से संबंधित संरचनाकार-विशारद आदि ने सहभाग लिया. इसमें 52 संस्थाओं ने सहभाग लिया. इससे 15 टीमों का चयन किया गया. इन टीमों को शहर के पांच रास्तों की पुनर्रचना के लिए संकल्पना प्रस्तुत करने और उसके प्रत्यक्ष क्रियान्वयन का काम दिया गया. इस स्पर्धा के बाद यह रास्ते राहगीरों के लिए खुले किए गए.
स्पर्धा में सफल संस्था और संबंधित सड़कें निम्नलिखित – विक्रोली पार्कसाईट रोड क्र.17 – बांद्रा कलेक्टीव रिसर्च एन्ड डिजाईन फाऊंडेशन, मौलाना शौकत अली रोड – मेड(ई) ईन मुंबई, ई नेपीयन सी रोड – स्टुडिओ पोमग्रेनेट, राजाराम मोहन रॉय रोड – स्टुडिओ इनफिल एन्ड डिजाईनशाला कोल्याबरोटिवी, एस.वी. रोड – प्रसन्न देसाई आर्किटेक्टस.
इसी तरह से मुंबई के कुल दो हजार किलोमीटर्स के रास्ते राहगीरों के लिए सुसह्य और सहज चलने के लिए खुले किए जाएंगे. इससे मोटर यातायात भी सुचारू होगी. इसमें पदपथ खुले करना, उनकी चौड़ाई बढ़ाना, डिवाइडर और जोड़ रास्तों के साथ व्यापारी पेठों में रास्तों का रखरखाव, सौंदर्यीकरण आदि के साथ बस स्टॉप की रचना में सुविधापूर्ण बदलाव हो, ऐसी संकल्पना है.
इस समय नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे, विधायक श्री. आदित्य ठाकरे, श्री. अनिल परब, मुख्यमंत्री के प्रधान सचिव विकास खारगे, महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, पुलिस आयुक्त संजय बर्वे, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण के महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगर विकास विभाग के अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, म्हाडा के मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित थे.
०००००
Development does not means merely concretization
Only cleanliness is not enough, entire personality of the cities need drastic changes
– Chief Minister Thackeray
Mumbai, December 27:- “Not only sanitation and cleanliness but the entire personality of cities in the state needs drastic changes. The metropolitan city on the world map like Mumbai need not only be concretized, but it should be made beautiful,” said Chief Minister Mr Uddhav Thackeray.
He was addressing the assistant commissioners and ward officers of Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM). He also to the stock of various undertakings implemented in MCGM jurisdiction for its cleanliness and beautification. He also visited the exhibition organized for beautification of the Pathways in Mumbai Metropolitan.
Chief Minister Thackeray further said that the roads, footpaths, parking lots, amusement parks, grounds, vegetable markets, school premises, health, water and other civic amenities should be made world quality and each one should strive hard for doing this. He said that various government departments should work in coordination for enhancing and changing the face of the city.
Illegal hoardings be removed
He said that with the increasing pollution of air in Mumbai, the graph of pleasant visibility is going down and it is necessary to overcome it. He said that the Municipal Corporation of Greater Mumbai should design the hoarding policy and stringent action should be taken against all those who are defacing city without legal permission by displaying the Holdings, billboards and other advertising material. He said that he himself will hold discussions with the political parties in order to resolve the issue.
Assistant Commissioner doing good job will be rewarded
Chief Minister Mr. Thackeray said that action should be initiated against all those who are putting debris and disposing off the waste in the city. He also asked the administration to regularly pick up the debris and garbage and design a time bound program for this cause. Mr Thackeray also directed the administration to beautify the parking lot, look after the footpath, rectify the railing and plant the saplings which can survive in the local atmosphere.
He said that the walls on the service roads should also be beautified and for this, the world renowned artists can be hired for service. Mr Thackeray said that the repairing of 50 vegetable markets, out of 52, is completed and the civic body should concentrate on development of remaining two markets. He said that the meeting of Assistant Commissioners will be held every three months in order to take the stock of the work done and that, which is in progress. He said that Assistant Commissioners doing good job with devotion will be felicitated. The chief minister also said that serious note should be taken about whether the development of Mumbai city is going as per the development plans or not. He said that the development is needed to be all inclusive. Besides roads and Footpaths, the green belts on service roads, removing of old vehicles from beneath the flyovers and beautifying the place should also be taken as priority.
He also said that if good facilities are provided to the citizens, they use it more and so if good pathways are made available, they will be using it. He said that this will also enhance the reputation of Mumbai and attract the tourist towards this world renowned metropolitan city. Mr Thackeray said that this year there will be no rain water accumulation at various places and for this, the cleanliness drive like nullahs, footpaths, gutters should be taken up with priority. He said that if the MCGM is facing any problems, it should be brought to the notice of the state government so that all out efforts can be taken to solve them.
Initiate action against people creating debris- Eknath Shinde
Urban Development Minister Mr Eknath Shinde said that the increase in accidents in the metropolitan city is due to bad condition of the pathways in the city so the Municipal Corporation should concentrate on the repairing and good management of these footpaths. He directed them to take strict action against all those who are dumping the debris and construction leftovers on public places. He also said that if the plan and efforts taken by MCGM for beautification of Mumbai city are successful, they will be implemented in all the civic bodies of the state.
Study for traffic management necessary Aditya Thackeray
MLA Aditya Thackeray said that it is necessary to study the traffic management system and suggested that the beautification of western Express Highway and that under various flyovers in the city should be done. He also said that the concept of vertical garden should be implemented, besides the service roads and also suggested that the distance between the hoardings displayed in Mumbai city should be finalized and new advertisement board policy be prepared.
Aditya also said that the municipal corporation should give the information of the repairing of roads and beautification works to the common people. He said that the construction of metro rail is on in the city and water gets accumulated at various places. All the sanitation work should be undertaker and to ensure that in the next monsoon, no water is accumulated anywhere in the entire metro city. For this, he said, the administration will have to concentrate on cleanliness drive including Nullah, gutters and other garbage dumping areas.
All the assistant commissioner of the Greater Mumbai Municipal Corporation gave the information about various developmental works in their wards including that of pathway cleaning, road repairing, removal of banners and hoardings, dumping of garbage and other like works related to civic amenities. Additional commissioner Vijay Singhal, Aabasaheb Jarhad, Pravin Darade, Suresh Kakani, joint commissioners, deputy commissioners and heads of various departments were present on the occasion.
CM visits Street lab exhibition
The Mumbai Municipal Corporation is taking all out efforts to see that the road traffic is smooth and safe and the footpath are vacated and made free for the pedestrians. For this, one competition was organized in collaboration with Blue Murg philanthropist and WRI India for re-construction of road. The plans of five roads were prepared in this competition. The information about this was given to Chief Minister Mr Uddhav Thackeray at Sahyadri guest house through exhibition. Various designers, Architects for designing the roads participated in Mumbai ‘Street lab competition’. A total of 52 Institutions took part. 15 teams was selected. These teams prepared the concept of restructuring of five roads in the city and they were given the responsibility for implementing that plan. These roads were open for the pedestrian and more than 70 thousand square feet space was made vacant on these five roads without any major renovation. This information was given during the exhibition.
The successful institutions in the competitions and their respective roads are as follows:- Vikhroli Parksite road number 17 -Bandra collective Research and design Foundation, Maulana Shaukat Ali Road- Mad(E) in Mumbai, Napien C Road- studio pomegranate, Raja Rammohan Roy Road- Studio in fill and design Shala collaborative, SV road -Prasanna Desai architects.
In this way, roads more than two thousand kilometers are going to be made free for the pedestrian in the city and this will also help the smooth running of traffic in the city. This includes clearing the foot paths, increasing the breadth of the roads, beautification of the dividers and adjoining roads in the business areas, construction of Bus shades, restructuring the roads and other such amenities.
Urban Development Minister Mr Eknath Shinde, MLA Aditya Thackeray, Mr Anil Parab, principal secretary of the Chief Minister Vikas Kharge, commissioner of the Corporation Praveen Pardeshi, commissioner of police Sanjay Barve, Metropolitan commissioner of Mumbai Regional Development Authority R A Rajeev, additional chief secretary of Urban Development Department Dr Nitin Kareer, principal secretary Manisha Mhaiskar, chief executive officer of MHADA Milind Mhaiskar and others were present on this occasion.