पियुषच्या पाठीवर मुख्यमंत्र्याची कौतुकाची थाप !!

मुंबई, दि. 26 :   केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या  एनडीएच्या परीक्षेमध्ये देशात 16 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकवलेल्या पियुष नामदेव थोरवे याने आपल्या पालकांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. तेव्हा त्याच्या गळ्यात पुष्पहार घालून मुख्यमंत्र्यांनी त्यास जवळ घेतले,त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पियुष नाशिक पंचवटीचा राहणार असून त्याने नेव्ही मध्ये रुजू होण्याचे निश्चित केले आहे,पुढील आठवड्यात तो प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचेही त्याने सांगितले. 16 ते 19 वयोगटातील मुलांसाठी ही परीक्षा असते जी 12 वी नंतर द्यायची असते, अशी माहितीही त्याने यावेळी दिली.

००००