‘दिलखुलास’कार्यक्रमात उद्या ‘हायवे मॅनर्स’ विषयावर अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांची मुलाखत

मुंबई,दि.२६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘हायवे मॅनर्स’ (महामार्ग सुरक्षा) या विषयावर अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. २७ आणि सोमवार दि. ३०  डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘हायवे मॅनर्स’या अभियानाचे टप्पे,वाहनांची महत्तम वेग मर्यादा,हेल्मेट,सीटबेल्टचा वापर करणे आवश्यक,रॅश ड्रायव्हिंग (बेदरकारपणे वाहन चालविणे) हे रोखण्यासाठी करण्यात येणारी कारवाई,लेनची सुरक्षितता पाळणे,वाहन चालवताना मानवी चुका टाळणे,वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी करण्यात येत असलेली जनजागृती या विषयांची सविस्तर माहिती श्री.कारगांवकर यांनी‘दिलखुलास’कार्यक्रमात दिली आहे.

0000