मुंबई,दि. 26 : पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या हप्त्यासाठी आर्थिक वर्ष 01 जून ते 31 मे असे निश्चित करण्यात आले आहे. माजी सैनिक,विधवा आणि अवलंबितांत यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्या वी. रत्नपारखी यांनी केले आहे.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजेनेसाठी 1 जून ते 31 मे या वर्षाकरिता वार्षिक रु. 12/- + (सेवाकर) हप्ता आहे. तो दरवर्षी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होणार आहे. यासाठी माजी सैनिक,विधवा आणि अवलंबितांच्या बँक खात्याची माहिती संकलीत करावयाची आहे. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील माजी सैनिक,विधवा आणि अवलंबितांत यांनी आपल्या नावाची नोंद करावी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,मुंबई शहर येथे नाव नोंदवण्यात यावे, असे आवाहनही मुंबई शहरचे कॅप्टन विद्या वी. रत्नपारखी यांनी केले आहे.
०००००