सूरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्पाला चालना देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

0
8

विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनांवरही तातडीने कार्यवाही होणार

नागपूर दि.17 : गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रेल्वे सुविधा, अन्य दळणवळण, वीज पुरवठा यासारख्या विकास कामांना चालना मिळून नक्षलवाद कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे या प्रकल्पास चालना द्यावी,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. या बैठकीस उपस्थित असलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेल्या मुद्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विदर्भातील जिल्हानिहाय बैठका घेऊन श्री. ठाकरे हे आढावा घेत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याचा आज आढावा घेण्यात आला. या बैठकीस राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री धर्मरावबाबा आत्राम, देवराव होळी, रामदास आंबटकर, कृष्णा गजभिये तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव यांचीही उपस्थिती होती.

या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील पदभरती, दूरसंचार समस्या, शेतीविषयक समस्या, धान खरेदी याबाबतचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही समस्या असल्यास हक्काने माझ्याकडे या. धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याआधीच भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचे नियोजन करावे,असे निर्देशही त्यांनी दिले आहे.

लगतच्या तेलंगाणाराज्यातील कालेश्वरम येथे होत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजच्या कामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही क्षेत्र बुडीत झाल्याने स्थानिक आदिवासींचे नुकसान झाले आहे. मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाचीही एका समितीमार्फत तपासणी करुन राज्याच्या हद्दीत झालेल्या परिणामांची पाहणी करावी. ही माहिती एकत्र करुन अहवाल तयार करावा,अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचना

या आढावा बैठकीतविधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनीसूरजागड लोह उत्खनन प्रकल्प, धान खरेदीमेडीगट्टा बॅरेज या विषयावर शासनाला सेचना केल्या. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कामांबाबत सद्यस्थिती बैठकीत सांगितली. 0000

Impel the Surjagad Iron Mineral Excavation Project

Chief Minister Uddhav Thackeray’s instructions

* Quick action will take place on instructions given by the Speaker of the Legislative Assembly, Nana Patole.

Nagpur, 17.Dec.19: “The Surajagad iron mineral excavation project in Gadchiroli is the catalyst for the development of the district. The project would help in reducing the naxalism by promoting development works like railway facilities, other transport and electricity supply in the district.  Quick action should take place on the instructions raised by the Speaker Nana Patole” said Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking in a meeting organized to take review of development works in Gadchiroli district, today.  According to the winter session of the State Legislature, Mr. Thackeray is reviewing district wise development work in Vidarbha region.

During the meeting, Chief Minister Thackeray learned about various problems in the Gadchiroli district. He directed the administration to immediately resolve the issues related to recruitment in the district, problems in telecommunication, agricultural, procurement of Dhan and prepare the strategy to resolve future problem in the process of procurement of Dhan

“Due to the work of the Medigatta Barrage at Kaleshwaram in Telangana state, some areas in Gadchiroli district have been submerged resulted in to loss of local tribes. The Medigatta irrigation project should also be examined by a committee and examine the results within the boundaries of the state and prepare the report by collecting all the information in this concern” instructed honorable Chief Minister.

State Assembly Speaker Nana Patole, Home Minister EknathShinde, MP of Gadchiroli-ChimurLokSabha constituency Ashok Nete, MLA Dharmarao Baba Atram, DevraoHoli, RamdasAmbtkar, Krishna Gajbhiye and local office bearers were present in the meeting.

Assembly Speaker Nana Patole’s suggestion

VidhanSabha Speaker Nana Patole attended this review meeting. During this time he advised the government on the Surajagad iron excavation project, Dhan procurement and Medigatta Barrage. Gadchiroli District Collector Shekhar Singh informed about the various works implementing in the district in the meeting.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here