यवतमाळ जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी प्राधान्याने निधी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक

नागपूर दि. 16 : यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून  दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विधिमंडळ सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार सर्वश्री वजाहत मिर्झा, ख्वाजा बेग, निलय नाईक, विधानसभेचे आमदार सर्वश्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे, डॉ. अशोक उईके, नामदेव ससाणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, किशोर तिवारी आदी उपस्थित होते.

यवतमाळ हा कृषिक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जिल्हा आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यात येतील. अधिवेशन काळात विदर्भातील जिल्ह्यांच्या आढावा बैठकांचे नियोजन करण्यात येते, स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय होण्यासाठी राज्यातील इतरही भागात जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्यात येतील. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदतीचा निधी जिल्ह्यांना पोहोचला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 102 कोटींचे वाटप झाले असून द्वितीय टप्प्यातील 222 कोटींची मदत वाटपाची कार्यवाही तालुका स्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक विकासाचा निधी उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व उपाययोजना, जलसंधारणाच्या प्रकल्पांची प्रगती, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतीतील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची सद्यस्थिती, जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाचा आढावा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपाचा विज पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, मुख्यमंत्री पेयजल योजना आदींबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सादरीकरण केले. यावेळी आमदारांनी सिंचन, रस्ते, अपूर्ण प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी, अल्पसंख्यांकाबाबतचा निधी, शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करणे, खनिज विकास निधी, पैनगंगा अभ्यायारण्यातील 40 गावांतील रस्त्यांचा प्रश्न, वसंतराव नाईक स्मृती स्थळासाठी निधी, पावरग्रीडसाठी जमीन भुसंपादन, माळपठारावरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढणे आदी समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

बैठकीला मुख्य सचिवांसह विविध विभागाचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. 00000

Funds will be given with priority

for incomplete irrigation projects in the district

– Chief Minister Uddhav Thckeray

Review meeting about developmental works in Yavatmal district

Nagpur, December 16 : Chief Minister Mr Uddhav Thackeray assured that funds will be made available with priority for completing the incomplete irrigation projects that supply water to the farm of the farmers in the Yavatmal district.

He was speaking in a meeting organized for taking stock of the Yavatmal district in the legislature hall. MLC Wajahat Mirza, Khwaja  Baig, Nilay Naik, MLA Sanjay Rathod, Indranil Naik, Madan Yerawar, Dr Sandeep Dhurve, Dr Ashok Uikey, Namdev Sasane, Sanjiv Reddy Bodkurwar, Kishor Tiwari and others were present on the occasion.

Chief Minister Thackeray further said that Yavatmal is the district of the father of Agricultural Revolution Vasantrao Naik. He said that the problems of this region will be resolved with the help of all. The review meetings are organized for the districts of Vidarbha during the legislative session and similarly such sort of meetings will be organized for other districts for taking stock of the development works. The Chief Minister also said that the financial assistance for the farmers affected by unseasonal rains has reached the district. In Yavatmal district 102rupees have been distributed in the first phase and the process for distribution of another 222 crore rupees in the second phase has begun at Taluka level.

Mr Thackeray also assured that the minority development funds will also be made available for this district. Presentation on the topics like loss due to unseasonal rain and measures to overcome it, the progress of water resources projects, the situation and repairing of roads under Zilla Parishad jurisdiction, present situation of Chief Minister gram Sadak Yojana, review of incomplete irrigation projects in the district, rehabilitation of the project affected people, electricity supply to Agricultural pumps, Prime Minister Awas Yojana, swachh Maharashtra campaign, Chief Minister peyjal Yojana was made by the Chief executive officer and care taker district magistrate Jalaj Sharma.

The members of Legislative assembly and Council presented various problems of the district including that of irrigation, roads, incomplete projects, funds for Pradhan Mantri Awas Yojana, funds for minorities, continuous power supply for farmers, mineral development funds, problem of 40villages under the PenGanga sanctuary, funds for Vasantrao Naik Memorial, acquisition of land for power grid, water problems in the plateau region etc. They demanded permanent solution for all these problems faced by the districts since long. The meeting was also attended by chief secretary and principal secretaries, senior officers of various departments.

0000