मुंबई,दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे…
1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे,मुख्यमंत्री : कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
2. श्री. एकनाथ संभाजी शिंदे : गृह,नगर विकास,वने,पर्यावरण,पाणी पुरवठा व स्वच्छता,मृद व जलसंधारण,पर्यटन,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम),संसदीय कार्य,माजी सैनिक कल्याण.
3. श्री. छगन चंद्रकांत भुजबळ : ग्रामविकास,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,अन्न व औषध प्रशासन.
4. श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात : महसूल,ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा,वैद्यकीय शिक्षण,शालेय शिक्षण,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.
5. श्री. सुभाष राजाराम देसाई : उद्योग आणि खनिकर्म,उच्च व तंत्रशिक्षण,क्रीडा व युवक कल्याण,कृषि,रोजगार हमी योजना,फलोत्पादन,परिवहन,मराठी भाषा,सांस्कृतिक कार्ये,राजशिष्टाचार,भूकंप पुनर्वसन,बंदरे आणि खारभूमी विकास.
6. श्री. जयंत राजाराम पाटील : वित्त आणि नियोजन,गृहनिर्माण,सार्वजनिक आरोग्य,सहकार व पणन,अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,कामगार,अल्पसंख्याक विकास.
7. डॉ. नितीन काशिनाथ राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),आदिवासी विकास,महिला व बाल विकास,वस्त्रोद्योग,मदत व पुनर्वसन,इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.
—–000—–