जळगाव जिल्ह्यातील बोदवडमधील ग्राम न्यायालय बंद करण्याची अधिसूचना

मुंबई, दि.11: जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सुरू झाल्यामुळे तेथील ग्राम न्यायालय बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना विधी व न्याय विभागाने काढली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड (ता. बोदवड) येथे जानेवारी 2012 पासून ग्राम न्यायालय स्थापन करण्यात आले होते. मात्र, आता 16 जून 2019 पासून तेथे नियमित न्यायालय म्हणून दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यात आले असून त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे बोदवडमधील ग्राम न्यायालय बंद करण्यात आले असल्याची अधिसूचना विधी व न्याय विभागाचे सह सचिव यो. हि. आमेटा यांच्या स्वाक्षरीने 4 डिसेंबर 2019 रोजी काढली आहे.