ग्रंथालयांना समान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

0
10

मुंबई, दि. 6 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नूतनीकरण या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळावरून उपलब्ध (download) करून या योजनेअंतर्गत अर्ज करावा असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

सन 2019-20 साठी 5 वेगवेगळया असमान निधी योजना आहेत.

1.ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसाम्रगी, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य

 2.राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी र्थसहाय्य

3.राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा

4.प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य

5.बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य अशा पाच प्रमुख असमान निधी योजना आहेत.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचेwww.rrrlf.nic.in  हे संकेतस्थळ पाहावे. ग्रंथालयांनी समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव (विहित नमुद पद्धतीत)आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहोचतील अशा  बेताने पाठविणे आवश्यक असल्याचे ग्रंथालय संचालक यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here