‘लोकराज्य’च्या नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ अंकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई,दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2019 अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे करण्यात आले. या अंकाचे अतिथी संपादक मंत्री एकनाथ शिंदे हे आहेत.

या अंकामध्ये मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा शपथविधी कार्यक्रम,मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय आणि  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 विधानसभा सदस्यांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला आहे. याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे विशेष लेखांनी हा अंक सजला आहे. गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर विशेष लेखही या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे,मुख्य संपादक ब्रिजेश सिंह,प्रबंध संपादक अजय अंबेकर,संपादक सुरेश वांदिले,सहसंपादक कीर्ती पांडे आदी उपस्थित होते.