डॉ. आंबेडकर यांच्या बीआयटी चाळ येथील निवासस्थानी भेट
मुंबई, दि. 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या खोलीस पटोले, ठाकरे यांची भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळच्या’बीआयटी‘ चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50, 51 मध्ये राहत असत. याठिकाणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी बुद्धवंदना घेण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे जतन करण्यात आलेल्या वस्तू तसेच छायाचित्रांचीही माहिती घेतली. डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्यामुळे ही वास्तू एक महत्त्वाचे वारसास्थळ ठरली आहे. त्यामुळे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, खासदार राहूल शेवाळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि उपस्थित होते. ०००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर के परळ स्थित निवास को राष्ट्रीय स्मारक के रूप में विकसित करेंगे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळ के दामोदर हॉल के पास बीआईटी चाल स्थित इमारत के दूसरे मंजिल पर रहते थे। वह 1912 से 1934 तक 22 साल यहा रहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चैत्यभूमि दादर में घोषणा की, कि उनके निवासस्थान को एक राष्ट्रीय स्मारक के रूप में विकसित किया जाएगा। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के 63वें महापरिनिर्वाण दिवस पर, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चैत्यभूमि में डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पचक्र अर्पित कर अभिवादन किया। इस मौके पर विधान परिषद की उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटिल, सुभाष देसाई, बालासाहेब थोरात, सांसद राहुल शेवाले, विधायक जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, मुंबई की मेयर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि उपस्थित थे।
0000