इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
8

मुंबई, दि. 5 : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात श्री.ठाकरे म्हणतात, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे आगळेवेगळे स्मारक ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्याय आणि बंधुतेचा विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसाचे जीवन सुसह्य व्हावे, त्याला त्याचे हक्क मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील.

या कार्यासाठी प्रेरणादायी ठरणारे इंदू मिल येथील स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणारे नागरिक आणि भीमसैनिकांचे त्यांनी स्वागत केले आहे.

००००

विश्व के लिए प्रेरणादायी साबित होगाइंदू मिल स्थित डॉ. बाबासाहब का नियोजित स्मारक- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 5 : दादर स्थित इंदू मिल की जगह पर राज्य सरकार की ओर से बनाए जा रहे भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर का अंतरराष्ट्रीय स्मारक विश्व को अन्याय एवं विषमता के खिलाफ लड़ने के लिए प्रेरणादायी साबित होगा, यह विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त किया।

भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिन के उपलक्ष्य में उनकी स्मृति को अभिवादन करते हुए दिए गए संदेश में श्री. ठाकरे ने कहा कि डॉ. बाबासाहब ने विषमता के खिलाफ आवाज उठाई, एक प्रकार से उनका जीवन ही ज्वाला था। मनुष्य को जीवन जीने का अधिकार दिलाने के लिए वे लड़े। इंदू मिल स्थित नियोजित स्मारक उनके विचारों का प्रचार एवं प्रसार का एक अनोखा स्मारक साबित होगा।

अन्यायग्रस्त, वंचित, अपने जीवन से हार गए ऐसे मनुष्य को विषमता एवं अन्याय के खिलाफ लड़ने एवं जीतने की प्रेरणा इस स्मारक से ही मिलेगी, यह विश्वास मुख्यमंत्री ने इस दौरान व्यक्त किया।

उन्होंने कहा कि यह सरकार आम जनता की सरकार है। बाबासाहव ने दिए हुए समता, न्याय और बंधुता के विचारों से सरकार की दिशा होगी। उन्हें अभिप्रेत ऐसी लोकशाही प्रणाली अस्तित्व में आए और आम लोगों का जीवन सुसह्य हो, उन्हें उनका हक मिले, इसके लिए यह सरकार हमेशा प्रयासरत रहेगी।

मुख्यमंत्री ने इस कार्य के लिए प्रेरणादायी ऐसी इंदू मिल स्थित स्मारक का काम पूरा किया जाएगा, यह ग्वाही भी दी। महापरिनिर्वाण दिन के अवसर पर चैत्यभूमि पर आनेवाले नागरिक और भीमसैनिकों का उन्होंने स्वागत भी किया है।

००००

Monument of Dr. Babasaheb Ambedka at Indu Millwill be the inspiration for the world

– Chief Minister

Mumbai, Dec 5:“This international monument of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, erected on behalf of the state government at the site of Indu Mill in Dadar, will inspire the world to fight against injustice and inequality”said Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking while offering salutation to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Mahaparinirvana day.

Mr. Thackeray further stated that Dr. Babasaheb fought against inequality. His life was nothing but a blazing fire. He called a big fight to gain the right to live as a human. The planned monument of Dr. Ambedkar at Indu Mill would be helpful to promote his thoughts and policies. This monument would inspire the unjust and deprived to fight against the odds and injustice.

“This is the government of the general public. This government will proceed towards the ideas of equality, justice and brotherhood given by Babasaheb. We will strive to ensure that the democratic system that Babasaheb was intending to exist in and to ensure that the common man’s life will be comfortable and public will get their all rights”said honorable Chief Minister.

The Chief Minister also said that the monuments at Indu Mill would be completed. This monument would give inspiration to government to follow the direction shown by Dr. Babasaheb Ambedkar. He welcomed all Bhimsainik and the people who came to the Chaityabhoomi on the occasion of Mahaparinirvana Day.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here