स्टार्टअपस्‌ना पाठबळ देण्यासाठी मायक्रोसॉफ्टचा उपक्रम

0
4

मुंबई, दि. 5 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहकार्याने ‘मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअपस्’ ने 17 डिसेंबर, 2019 रोजी पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे ‘हायवे टू अ हंड्रेड युनिकॉर्न’ हा उपक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात स्टार्टअप असणारे उद्योजक आणि व्यावसायिक सहभागी होऊ शकतील. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना अज़्यूर, मशीन लर्निंग व अर्टिफिशियल इंटेलिजेंस याबाबत मार्गदर्शन मिळेल. युनिकॉर्न बनण्यासाठी इच्छुक असलेल्या स्टार्टअपना https://aka.ms/H2100-pune वेबसाईटवर अर्ज करता येतील.

नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्टार्टअपना मदत करण्याकरिता मायक्रोसॉफ्टने ‘हायवे टू अ हंड्रेड युनिकॉर्न’ ही कार्यक्रम मालिका सुरु केली आहे. यामुळे स्टार्टअपसना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील स्टार्टअपनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी केले आहे. महाराष्ट्र हे देशात स्टार्टअपबाबत आघाडीवर आहे.

मायक्रोसॉफ्टचा हा उपक्रम राज्यातील स्टार्टअपना चांगली संधी असल्याचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्ट उपक्रमाच्या भारताच्या प्रमुख श्रीमती लतिका पै यांनी या उपक्रमाद्वारे नवनिर्मिती करणाऱ्या स्टार्टअप उपक्रमाद्वारे भारतात पहिल्यांदाच संवाद साधला जात असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here