अतिरिक्त सहाय्यक अधीक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.30 :जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सांताक्रूझ-कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त सहाय्यक अधीक्षिका हे पद भरण्यात येणार आहे. महिलांसाठी असलेले हे पद कंत्राटी पद्धतीचे असून या पदासाठी23डिसेंबर2019पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची पात्रता व इतर अटी पुढीलप्रमाणे आहेत.1.अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य), 2.शिक्षण- एस.एस.सी. पास, 3.एमएससीआयटी उत्तीर्ण व टंकलेखन (टायपिंग) येणाऱ्यास प्राधान्य, 4.वयोमर्यादा-30ते50वर्षे, 5.मानधन रु.17,823/-दरमहा एवढा देण्यात येणार आहे.

अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक23डिसेंबर2019असून मुलाखतीची तारीख– 24डिसेंबर2019  अशी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कमांडर मिनल मधू पाटील यांनी केले आहे.

पत्रव्यवहाराचा पत्ता – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,मुंबई उपनगर, 9वा माळा प्रशासकीय इमारत,शासकीय वसाहत,बांद्रा पूर्व,मुंबई -400 051,दूरध्वनी– 26552172