मुंबई,दि.30: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’या विषयावर उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि.2,मंगळवार दि.3 डिसेंबर2019रोजी सकाळी7.25 ते7. 40या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान,कामगारमंत्री म्हणून डॉ. बाबासाहेबांनी केलेले कार्य त्याचबरोबरऔरंगाबादमध्ये झालेल्या तीन दिवसीय जागतिक बैाध्द धम्म परिषदेचा उद्देश,या बौध्द परिषदेची फलनिष्पत्ती आदी विषयांची माहिती डॉ. कांबळे यांनी‘दिलखुलास’या कार्यक्रमातून दिली आहे.