चंदगड, हातकणंगले व ढाणकी नगरपंचायतींसाठी २९ डिसेंबरला मतदान

0
9

विविध नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

मुंबई, दि. 29 : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित 3 नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 30 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 13 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 18 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.

नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका: मोर्शी, धरणगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी.

नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या जागांचा तपशील: गडहिंग्लज- हद्दवाढ क्षेत्रासाठी, मलकापूर- 7, वाई- 8, खानापूर- 7, बार्शी- 5, मनमाड- 1, भुसावळ- 4, भडगाव- 3, नवापूर- 6अ आणि 7, परंडा- 7, कळंब- 8, उमरेड- 11, भिवापूर- 4, सिंधी (रेल्वे)- 8, मोहाडी- 4, 9 आणि 12, साकोली- 6, कोरपणा- 16, भामरागड- 5 आणि 16.

०-०-०

(Jagdish More, SEC)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here