मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सचिवांशी संवाद
मुंबई, दि. 29 : ‘हे माझं सरकार ’ अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण व्हावी असे काम करा. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयात राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध विभागांच्या सचिवांशी बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या कार्यालय प्रवेशासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन फुलांनी सजविण्यात आले होते. प्रवेशाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांनी औक्षण करून स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार दिवाकर रावते आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी आदींनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.
यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विविध विभागांच्या सचिवांशी संवादही साधला.‘राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाची जोड मिळाल्यास प्रगती होते. त्यामुळे जनतेच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. ०००
जनता के मन में‘यह हम सबकी सरकार’ की भावना
निर्माण होनीचाहिए – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मंत्रालय में पदभार स्वीकार किया, सचिवों से साधा संवाद
मुंबई, दि. 29 : ‘यह हम सबकी सरकार’ इस तरह की भावना आम लोगों के मन में निर्माण हो सके, इस तरह से काम किया जाए, लोगों का भरोसा जीतने और उसे संपादित करने के लिए प्रयास किए जाने की आशा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ने आज यहाँ पर व्यक्त की। मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने मंत्रालय में राज्य के 29 वे मुख्यमंत्री के रूप में पदभार स्वीकार किया। इसके बाद हुई बैठक में विविध विभागों के सचिवों से संवाद साधते हुए वे बोल रहे थे।
मुख्यमंत्री श्री. ठाकरे के कार्यालयीन प्रवेश के लिए मंत्रालय के छठे मंजिल पर स्थित मुख्यमंत्री सदन फूलों से सजाया गया था, प्रवेश के अवसर पर मुख्यमंत्री श्री. ठाकरे के विधान परिषद के उपसभापति डॉ. नीलमताई गोऱ्हे एवं मुख्यमंत्री कार्यालय के महिला अधिकारियों ने उनका औक्षवंत (औक्षण) कर स्वागत किया।
इस दौरान मुख्यमंत्री श्री. ठाकरे के साथ मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबल, बालासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, विधायक आदित्य ठाकरे समेत सांसद विनायक राऊत, विधायक दिवाकर रावते आदि मान्यवर उपस्थित थे। श्रीमंत शाहू छत्रपति समेत विविध क्षेत्रों के मान्यवरों ने मुख्यमंत्री श्री. ठाकरे को पुष्पगुच्छ देते हुए उन्हें शुभकामनाएँ दी।
इसके अलावा प्रशासन की ओर से मुख्यमंत्री श्री. ठाकरे के राज्य के मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी आदि ने भी उनका स्वागत किया।
इसके बाद हुई बैठक में मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने विविध विभागों के सचिवों से संवाद साधा। बैठक में उन्होने कहा कि‘राज्य के विकास को गति देने के लिए प्रशासन का साथ होना चाहिए, यह साथ मिलने पर विकास होगा। इसलिए लोगों के दिलों में जो सपना है, उसे पूरा करने तथा परिवर्तन के लिए प्रयासरत रहने का आवाहन भी मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने इस दौरान किया।
००००