‘अर्थ केअर पुरस्काराने’ वन विभाग सन्मानित
मुंबई, दि. १४ : जेएसडब्ल्यू- टाइम्स ऑफ इंडियाकडून‘इनोव्हेशन फॉर क्लाईमेट ॲक्शन’ साठी दिल्या जाणाऱ्या ‘अर्थ केअर’ पुरस्काराने काल वन विभागाला सन्मानित करण्यात आले. तीन वर्षात लोकसहभागातून करण्यात आलेल्या ५० कोटी वृक्षलागवडीसाठी अवलंबिलेल्या डिजिटल फॉरेस्ट गव्हर्नंससाठी वन विभागाला हा पुरस्कार मिळाला आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि ३ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, भारत सरकारचे सचिव सी.के. मिश्रा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रधान सचिव वने विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्वश्री यु.के.अग्रवाल, एम. के. राव यांनी हा पुरस्कार सर्व सहकाऱ्यांच्यावतीने स्वीकारला.
पुरस्कार पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा – विकास खारगे
वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यासंदर्भात म्हणाले की, हा पुरस्कार एकट्या वन विभागाचा नाही तर वृक्षलागवडीत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, संस्था आणि संघटनेचा हा पुरस्कार आहे. या सर्वांच्यावतीने आम्ही हा पुरस्कार स्वीकारला आहे. या सर्वांनी एकत्र येत वृक्षलागवड हा केवळ शासकीय उपक्रम न ठेवता त्याचे लोकचळवळीत रुपांतर केले. त्यामुळे हा पुरस्कार या सर्वांच्या समर्पणाचे फलित आहे.
पाच प्रवर्गातील पुरस्कारासाठी १०९ अर्ज प्राप्त झाले होते. पुरस्कार निवडीसाठी डॉ.माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने क्षेत्रिय पाहणी, प्रत्यक्ष मुलाखत घेऊन पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात वृक्षलागवडीसाठी मिळवलेला लोकसहभाग, वन जमिनीबरोबर वनेतरक्षेत्रावर करण्यात आलेली वृक्षलागवड व त्यासाठी अवलंबिण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म याचा अभ्यास करण्यात आला. या तीन निकषांना पात्र ठरून वन विभागाने हा पुरस्कार मिळवला असल्याचेही श्री. खारगे म्हणाले.
वन विभागाने वृक्षलागवडीतील विश्वासार्हता वाढावी, या कामात पारदर्शकता यावी म्हणून नागपूर येथे स्वतंत्र आय.टी सेल स्थापन केला होता. यात केपीएमजीसह एनआयसीने मोलाचे योगदान दिले होते. वृक्षलागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलवर लावलेल्या वृक्षाचे जिओ टॅगिंग करून अक्षांश रेखांशासह त्याची नोंद घेण्यात आली होती. १९२६ हॅलो फॉरेस्ट, हरित सेना, माय प्लांट सारखे मोबाईल ॲप्लिकेशन वन विभागाने विकसित केले होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्षलागवडीची सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून दिली होती. या सर्व कामाची दखल पुरस्कार देतांना घेण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
५० कोटी वृक्षलागवड – एक प्रवास
वाढते जागतिक तापमान, कधी दुष्काळ तर कधी पूरस्थिती यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड हा अनेक पर्यायांपैकी प्रभावी पर्याय असून माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने यासाठी पुढाकार घेतला. तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करतांना समाजातील प्रत्येक घटकाला यात सहभागी करून घेतलं. शासनाच्या विविध विभागांबरोबरच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, राज्यातील विविध स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, संघटना, उद्योजक-व्यापारी वर्ग, लोकप्रतिनिधी, सिनेक्षेत्रातील मान्यवर या वृक्षलागवडीच्या मोहिमेत सहभागी झाले होते. यामुळेच वृक्षलागवड हा केवळ शासकीय उपक्रम न राहता ती लोकचळवळ झाली होती. याची सुरुवात १५ ऑगस्ट २०१५ ला शाळांच्या आवारात वृक्षलागवड करून झाली. राज्यात एकाच दिवशी ३० लाख झाडे लागली. १ जुलै २०१६ रोजी लोकसहभागातून एकाच दिवशी २ कोटी ८२ लाख झाडे लागली. यात ६ लाख लोक सहभागी झाले. याची लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. दोन कोटी वृक्षलागवडीला मिळालेला लोकांचा सहभाग पाहून पुढील तीन वर्षांसाठी ४, १३ आणि ३३ कोटी असे ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या तीन वर्षांपैकी पहिल्या वर्षी १ ते ७ जुलै २०१७ या सात दिवसांच्या कालावधीत ४ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प ५ कोटी ४३ लाख रोपे लागून पूर्णत्वाला गेला. या वृक्षलागवडीत १६ लाख लोक सहभागी झाले.
१ ते ३१ जुलै २०१८ या एक महिन्याच्या काळात १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १५ कोटी ८८ लाख रोपे लावून पूर्णत्वाला गेला. यामध्ये ३६ लाख लोक सहभागी झाले. दोन, चार आणि तेरा कोटी वृक्षलागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.
गेल्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प 35 कोटी १३ लाख ७६ हजार ३६१ रोपे लावून पूर्णत्वाला गेला. यात ९५ लाख १९ हजार ६३५ लोक सहभागी झाले होते. केलेल्या वृक्षलागवडीची वन विभागाने विकसित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंद करण्यात आली असून ती सर्व नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध असल्याचेही श्री.खारगे म्हणाले. ००००
‘अर्थ केयर पुरस्कार’ से वन विभाग सम्मानित
पर्यावरण संरक्षण में योगदान देने वाले प्रत्येक व्यक्ति पुरस्कार के मानक- विकास खारगे
जेएसडब्ल्यू- टाइम्स ऑफ इंडिया की ओर से इनोवेशन फॉर क्लाइमेट एक्शन के लिए दिए जाने वाले ‘अर्थ केयर‘ अवार्ड से कल वन विभाग को सम्मानित किया गया। तीन साल में जनभागीदारी से किए गए ५० करोड़ वृक्षारोपण के लिए अनुकूलित डिजिटल फॉरेस्ट गवर्नेंस के लिए वन विभाग को यह पुरस्कार मिला है। पुरस्कार का रूप में स्मृति चिन्ह, प्रमाण पत्र और ३ लाख रु मिला है।
नई दिल्ली में हुए कार्यक्रम में प्रख्यात वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, भारत सरकार के सचिव सी.के. मिश्रा के हाथों पुरस्कार वितरित किया गया था. प्रधान सचिव वन विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्वश्री यू.के अग्रवाल, एम.के. राव ने सभी सहयोगियों की ओर से पुरस्कार स्वीकार किया।
पर्यावरण संरक्षण में योगदान देने वाले प्रत्येक व्यक्ति का पुरस्कार- विकास खारगे
वन विभाग के प्रधान सचिव विकास खारगे ने कहा कि यह पुरस्कार अकेले वन विभाग के लिए नहीं है, बल्कि हर व्यक्ति, संगठन और संस्था का है जिन्होंने वृक्षारोपण में भाग लेकर पर्यावरण की सुरक्षा में योगदान दिया है। हम उन सभी की ओर से इस पुरस्कार को स्वीकार करते हैं। सभी एकत्र आ कर वृक्षारोपण को एक सरकारी उपक्रम नहीं, बल्कि आंदोलन में तब्दील कर देते हैं। इसलिए यह पुरस्कार उन सभी समर्पण का परिणाम है।
पुरस्कार के लिए पांच श्रेणियों में 109 आवेदन प्राप्त हुए थे। पुरस्कार के चयन के लिए डॉ. माशेलकर की अध्यक्षता में विशेषज्ञों की एक समिति बनाई गई थी। इस समिति ने क्षेत्र का निरिक्षण, वास्तविक साक्षात्कार और पुरस्कार के लिए उम्मीदवारों का चयन किया है। इसमें पेड़ लगाने के लिए लोगों का सहभाग, वन भूमि के साथ वन क्षेत्र के लिए अपनाए गए डिजिटल प्लेटफॉर्म के लिए अधिग्रहित भूमि के सार्वजनिक हिस्से का अध्ययन किया गया। वन विभाग ने इन तीन मानदंडों को पूरा करके यह पुरस्कार अर्जित किया है। ऐसा खारगे ने कहा। केपीएमजी के साथ एनआईसी ने महत्वपूर्ण योगदान दिया।
पेड़ लगाने के लिए बनाए गए वेब पोर्टल पर लगाए गए पेड़ की जिओ-टैगिंग अक्षांश देशांतर के साथ दर्ज की गई थी। वन विभाग द्वारा १९२६ में हैलो फॉरेस्ट, ग्रीन आर्मी, माय प्लांट जैसे, मोबाइल एप्लिकेशन विकसित किए गए। सूचना प्रौद्योगिकी का उपयोग करते हुए, सभी पेड़ लगाने की पूर्ण जानकारी सार्वजनिक डोमेन में उपलब्ध कराई गई थी। सूचना प्रौद्योगिकी का उपयोग करते हुए, सभी ट्री लॉगिंग जानकारी सार्वजनिक डोमेन में उपलब्ध कराई गई थी। उन्होंने कहा कि पुरस्कार प्रदान करने में इन सभी कार्यों का ध्यान रखा गया है।
००००
Forest Department receives ‘Earth Care Award’
This award belongs to everyone contributing to environment conservation- Vikas Kharge
‘Forest Department was honored with the ‘Earth Care’ award by JSW- Times of India for ‘Innovation for Climate Action’. The award was given to the Forest Department for its digital forest governance under which 50 crore trees were planted with the help of people contributing in the last three years. The award includes a memento, certificate, and three lakh rupees.
Famous scientist Dr. Raghunath Mashelkar, Secretary of Indian Government C.K. Mishra in a programme held in New Delhi, gave the award. Principal Secretary of Forest Department Vikas Kharge, Principal Chief Forest Conservator Sarvshri U.K. Agrawal, and M. K. Rao accepted the award on the behalf of all colleagues.
This award belongs to the everyone contributing to environment conservation. – Vikas Kharge
Principal Secretary of Forest Department Vikas Kharge said this award is not only for Forest Department. It belongs to every person, institution, and organization that contributed to environment conversation. We are accepting this award on behalf of all these people. They came together and turned a government initiative in a movement. This award is a result of their dedication.
109 applications were made for awards in five categories. A committee of experts was formed under the presidency of Dr. Mashelkar for the selection of award winners. Winners were selected after field inspection and direct interviews. Aspects like people’s contribution to tree plantation, trees planted in forestland and non-forest land and the digital platform adapted for it were studied. Shri. Kharge told that Forest Department qualified all three criteria and become eligible for the award.
Forest Department has established a separate I.T. cell at Nagpur for transparent tree plantation. KPMJ and NIC had given an important contribution to this task. A web portal was created for tree plantation. Planted trees were geographically tagged and their latitude plentitude wise location was registered. Forest Department has developed mobile apps like 1925 Hello Forest, Harit Sena, My Plant. Tree plantation related all information was made available in the public domain using information technology. The award was given considering all these things.
50 crore trees planted- a journey
Tree plantation is one of the effective options to solve problems like drought, flood situations, and increasing global warming. Forest Department took the initiative under the leadership of former Forest Minister Sudhir Mungantiwar. 50 crore-tree plantation in three years was aimed and every unit of the society was encouraged to participate in the programme. School-college students, NGOs, social organizations, businessmen, people representatives, and famous celebrities participated in this initiative along with the various departments of the Government. That is why this does not remain just a government initiative and turned into a mass movement. The tree plantation programme starts with planting tree in the school ground on 15th August 2015. 30 lakh trees were planted in the state on the same day. 2 crore 82 lakh trees were planted on 1st July 2016 with the help of people’s contribution. 6 lakh people participated in it. It is noted in Limca Book of Record. Considering the response received for two crore tree plantations, 4, 13 and 33 crore, in total 50 crore tree plantation is aimed for the next three years. 4 crore tree plantation was aimed in the first year but 5 crore 43 lakh saplings were planted in just seven days, 1st to 7th July 2017. 16 lakh people participated in this plantation.
Resolution of 13 crore tree plantation was completed by planting 15 crore 88 lakh plants in the month time of 1st to 31st July 2018. 36 lakh people participated in the programme. Tree plantation of 2,4 and 13 crore was registered in Limca Book of Record.
Resolution of 33 crore-tree plantation was completed and 13 lakh 76 thousand 361 plants were planted between July to September in the rainy season. 95 lakh 19 thousand 635 people participated in the tree plantation. Shri. Kharge told that all tree plantation was registered on the digital platform developed by the Forest Department and the data is open to all citizen.
0000