‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘चित्रकला व महाराष्ट्र’ या विषयावर मुलाखत

0
7

 

मुंबई,दि. ०७ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘जय महाराष्ट्र  दिलखुलासकार्यक्रमात सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट चे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र  बोरलेपवार यांची चित्रकला व महाराष्ट्रया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७. ३० वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत दिलखुलासकार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून   शुक्रवार दि.८, सोमवार दि.११, मंगळवार दि.१२ व  बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.दिलखुलासहा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअरया ॲपवरही शुक्रवार दि.८, सोमवार दि.११, मंगळवार दि.१२ व  बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत ऐकता येईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

     

सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टची वाटचाल, या संस्थेने घडविलेले कलाकार, एक कलाकार व त्याला निर्माण होणारी या क्षेत्रातील गोडी, कलेची जोपासना कशी करावी, तसेच आपले  करिअर व आवड अर्थातच कलेची सांगड कशी घालावी या प्रश्नांना अधिव्याख्याता  प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र  बोरलेपवार यांनी या कार्यक्रमात सविस्तर उत्तरे जय महाराष्ट्रआणि  दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहेत.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here