राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनात ‘अभया’ नाट्याचा प्रयोग

0
9

मुंबई, दि. 7 : बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील‘पोक्सोकायद्याबाबत जनजागृती करणाऱ्या अभयाया नाट्यप्रयोगाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कौतुकाची थाप दिली.

अभयाची प्रमुख भूमिका समर्थपणे पार पाडणाऱ्या चिन्मयी स्वामीचे तसेच लेखिका व दिग्दर्शिका मीना नाईक यांचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले.

कळसूत्रीनिर्मित अभयाया एकल महिला नाट्याचा ४०वा प्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत बुधवारी झाला.

नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता व अभिनेत्री श्रेया बुगडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. मनवा नाईक यांनी‘अभयानाटकामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला राजभवनचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

००००

Governor applauds the play ‘Abhaya’

Mumbai, 7th Nov :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today appaluded the one-woman play ‘Abhaya’ at Raj Bhavan, Mumbai. The play written and directed by Meena Naik narrates story of a 16 year old girl Abhaya who gets sexually abused by a stranger on the street. The play creates awareness about the Protection of Children from Sexual Offences Act (POCSO). The Governor complimented the Director and the lead actress Chinmayee Swami for the play. Eminent director – producer Vijaya Mehta, actress Shreya Bugade and the staff and officers of Raj Bhavan were present.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here