अकोला,दि. 3 : ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, सर्वश्री आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.
आपल्या या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी लाखनवाडा येथील संजय त्र्यंबक अघडते यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्या चार एकर शेतातील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. अघडते यांच्या शेतात सोयाबीनची नुकसानग्रस्त गंजीही मुख्यमंत्र्यांनी पाहिली. समोरच असलेल्या केशव नामदेव गावंडे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या ज्वारीच्या कणसांना पावसामुळे कोंब फुटले आहेत. तसेच मनोहर गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन पावसामुळे खराब झालेले आढळून आले. यावेळी श्री.फडणवीस यांनी शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कापशी रोड येथील गोपाल राऊत यांच्या शेताला भेट दिली.
गोपाल राऊत यांच्या शेतातील सोयाबीनचे पिक त्यांनी कापणी करुन तयार केले होते. त्यांच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गंजी लावून ठेवली होती. परंतु सततच्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोयाबीनच्या तयार दाण्याना कोंब फुटले व पत्रा शेड गळून पावसाचे पाणी गेल्यामुळे सर्व सोयाबीन खराब झाले आहे.
चिखलगाव येथील कृष्णकांत नारायणराव तिवारी यांच्या कापूस व विनोद नामदेव थोरात यांच्या सोयाबीनच्या पिकाची मुख्यमंत्र्यांनी भेट देवून पाहणी केली. परतीच्या प्रवासात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी म्हैसपूर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले.
मुख्यमंत्री ने क्षतिग्रस्त खेती का किया निरीक्षण
अकोला : अक्टूबर के महीने में हुई बैमौसम बारिश ने अकोला जिले की फसलों को गंभीर रूप से नुकसान पहुंचाया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज क्षतिग्रस्त क्षेत्र का निरीक्षण किया। किसानों के खेतों में जाकर, मुख्यमंत्री ने किसानों को आश्वस्त किया। केंद्रीय मानव संसाधन, सूचना और प्रौद्योगिकी राज्य मंत्री संजय धोत्रे, पालक मंत्री डॉ. रणजीत पाटिल, विधायक गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकले, महापौर विजय अग्रवाल, जिलाधिकारी जितेंद्र पापलकर एवं अन्य उपस्थित थे।
अपने इस निरीक्षण दौरे में , मुख्यमंत्री फडणवीस ने लाखनवाड़ा में संजय त्र्यंबक अघडते के खेत का दौरा किया। उनके चार एकड़ कपास के खेतों को नुकसान पहुंचा है। अघडते के खेत में उन्होंने क्षतिग्रस्त सोयाबीन को देखा। इसके सामने ही केशव नामदेव गावंडे के खेत में खड़ी ज्वार के दाने बारिश की वजह से अंकुरित हो गये हैं। इसी तरह, मनोहर गावंडे के खेत में सोयाबीन बारिश के कारण खराब हो गया है। इस अवसर पर श्री फड़नवीस ने किसानों से पूछताछ की और उन्हें मदद का आश्वासन दिया।
इसके बाद मुख्यमंत्री फडणवीस ने कापशी रोड पर गोपाल राउत के खेत का दौरा किया। गोपाल राउत ने अपने खेत से सोयाबीन की कटाई की थी। उन्होंने अपने खेत में स्थित टीन के शेड में फसल के ढेर लगाए थे। लगातार बेमौसम बारिश के कारण, सोयाबीन की फलियों में दाने उग आए और टिन शेड गल जाने के कारण बारिश के पानी से पूरी सोयाबीन फसल खराब हो गयी।
मुख्यमंत्री ने चिखलगांव में कृष्णकांत नारायणराव तिवारी की कपास की फसल और विनोद नामदेव थोरात की सोयाबीन की फसल का निरीक्षण किया। अपने वापसी दौरे में मुख्यमंत्री फडणवीस म्हैसपुर फाटा पर इकट्ठा हुए किसानों से मिले और उनकी बात सुनी तथा उन्हें आश्वस्त किया।
०००
Chief minister Fadnavis inspects the damaged crops in Akola
Akola, November 3:- The crops in Akola district had faced tremendous loss due to unseasonal rains that lashed the district in the month of October. Chief Minister Devendra Fadnavis today took a review of the damage crops in the district. He visited various farms and met farmers giving them solace.
Union minister of state for human resources and information technology minister Mr Sanjay Dhotre, Guardian minister Dr Ranjit Patil, Legislature Govardhan Sharma, Randhir Savarkar, Prakash Bharsakale, Mayor Vijay Agrawal, district magistrate Jitendra Papalkar were also present during the inspection.
The Chief Minister Mr Fadnavis visited the farm of Sanjay Trimbak Aghadte in Lakhanwada village. He reviewed the loss of cotton crops in his four acres of land and also took a stock of the loss to Soybean crop. Opposite to his farm, the CM also visited Keshav Namdev Gawande’s farm where the Jowar crops were sprouted due to the unseasonal rains that caused havoc in the district.
Mr Fadnavisalso saw the damaged crops of Soyabean in Manohar Gawande’s farm. The chief minister had interaction with them and assured them of providing financial assistance at the earliest. Later, the Chief Minister visited the farm of Gopal Raut on Kapshi road. Raut had harvested the soybean crops and stored it in a shed in his farm which was also damaged because of dripping of the rain water from the tin shed.
He also took stock of the destroyed soybean crops which were left useless. Mr Fadnavis visited the crops of Krishnakant Narayan Tiwari at Chikhalgaon and Kapashi. He took a stock of the damaged soybean crops of Vinod Namdev Thorat. While returning, the Chief Minister also met the farmers near Mhaispur fata and gave a patience hearing to their grievances. He assured them of sufficient financial assistance at the earliest.