पुण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात १४ जणांचा मृत्यू; ९ बेपत्ता

0
9

प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य सुरू;आज रात्रीही पावसाचा इशारा

पुणे,दि.26:पुणे शहरासह जिल्ह्यातील5तालुक्यांना काल रात्री मुसळधार पावसाचा फटका बसला. शहरासह ग्रामीण परिसरातील सखल भागातील घरात पाणी शिरले. नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील14जण दगावले असून9जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची5पथके कार्यरत आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले,यावर्षी22वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात धरणे भरली. काल रात्रीचा पाऊस मात्र खूपच होता. यावर्षी जिल्ह्यात सरासरी180टक्के पाऊस झाला आहे. कालच्‍या पावसामुळे जिल्ह्यात14जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील6,हवेली तालुक्यातील6,पुरंदर तालुक्यातील2जणांचा समावेश आहे.

या पावसाचा फटका जिल्ह्यातील15तालुक्यांपैकी5तालुक्यांना बसला आहे. पाच तालुक्यातील59गावे बाधित झाली आहेत. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पात्रात85हजार क्युसेक पाणी वाहत होते. या कऱ्हा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला. दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात38निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या शिबिरात2हजार500नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. तर पुणे शहरातील3हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. जिल्ह्यातील1हजार1कुटुंबांतील 3 हजार65लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात दरड कोसळून5रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्ह्यात एनडीआरएफची5पथके तैनात करण्यात आली असून275जवान मदत कार्य करत आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात एनडीआरएफची दोन पथके कार्यरत आहेत. या आपत्कालीन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्या वतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचारसंहितेचा कोणताही अडसर मदत व बचाव कार्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here