मुंबई, दि. 28 -सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या28झाल्याने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरज येथील शासकीय रुग्णालयास भेट देऊन उपचाराबाबत माहिती घेतली.
त्यांनी त्यावेळी सर्व डॉक्टर्स व अधिकारी यांची तातडीने बैठक घेतली.
बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून नवीन125खाटांचा स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घेतल्या.