विधानसभा लक्षवेधी

शहर रस्ते विकासासाठी जळगावला निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 मुंबई दि. 25 : जळगाव शहरातील रस्ते विकासासाठी प्रस्ताव प्राप्त होताच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य सुरेश भोळे यांनी आज विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जळगाव शहरातील रस्ते विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 38 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी प्रस्ताव सादर करण्यात आल्यावर मान्यता घेऊन वितरित करण्यात येईल.

जळगाव शहरासाठी विशेष औद्योगिक शहराची स्थापना करण्याबाबत विचार केला जाईल. तेथील वाढते उद्योग आणि पायाभूत सुविधांची आवश्यकता पाहता सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील आणि औद्योगिक शहराची स्थापना करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.