ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट त्रिसूत्रीनुसार कोरोनाचा प्रतिबंध -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0
2

· संवेदनशीलता दाखवत खासगी डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करावेत

·      बाधित19 रुग्णांना घरी सोडले

मुंबई,दि.27 : कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत. अशापरिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी,अशी सूचना करतानाच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग,टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून19रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या135रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे:

 राज्यात सधया135बाधीत रुग्ण आहेत. आतपर्यंत4228जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापेकी4017चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.135पॉझीटिव्ह आले.

 शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स,कर्माचारी वर्ग तसेच अन्य आपत्कालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहेत.

 कोरोना व्यतिरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरूराहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला,लहान मुलांचे आजार,हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखानेबंदठेवू नका. संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील.

 राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही.केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये,हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहान करण्यात येत आहे.

 ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे कोरोनाबाधि रुग्ण बरे होत आहेत.

 बाधित रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसींग नंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध,तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे.

 नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते,सामाजिक संघटना,मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

अजय जाधव..२७.३.२०२०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here