जे.जे. समूह रुग्णालयातील कोरोना रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी म्हणून सनदी अधिकारी विनिता सिंघल यांची नेमणूक – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई,दि.27 :जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथेकोरोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे,अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज येथे दिली.

जे जे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात300खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि60खाटांचा आयसीयू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात250खाटांची स्वतंत्र व्यवस्था  आणि50  खाटांच्या आयसीयू विभागाची  व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या करोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे यापैकी100खाटा आयसीयूसाठी असतील अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.