राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

0
11

मुंबई, दि. ६ : राज्यातील प्रत्येक गावात पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्द‍िष्ट पूर्ण करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यभार स्वीकारला, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, यापूर्वीही पाणीपुरवठा विभागात काम केल्याचा अनुभव असल्याने  ‘हर घर जल, हर घर नल’ हे उद्द‍िष्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्यास मदत होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्याला अपेक्षित असलेले काम पूर्ण करणार असून, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस पुरेसे पाणी पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, विभागाचे उपसचिव प्रविण पुरी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, जलजीवन मिशन अभियान संचालक यशवंत ऋषिकेश, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे, आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

                                                                           ०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here