मुंबई दि.8 : ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता) द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या पुरस्कारासाठी नाम निर्देशनाचा प्रस्ताव २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
तसेच या वर्षापासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वतः फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र सरकारच्या dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर संकेतस्थळावर सादर करावे.
तसेच ऑनलाईन अर्जाबाबत समस्या आल्यास 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं 5.30 पर्यंत संपर्क करावा. केंद्रशासनाच्या विविध पुरस्कारांची सविस्तर माहिती व नियमावली व विहित नमुना https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.
०००