मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर, दि. 21 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी सदिच्छा भेट देत पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सुयोग येथील सभागृह, भोजनकक्ष आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी सुयोग येथील सभागृहात पत्रकार बांधवांशी अत्यंत अनौपचारिक वातावरणात झालेल्या चर्चेत हिवाळी अधिवेशन, निवडणूक, राजकारण, समाजकारण आदी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला.

आमदार प्रताप सरनाईक, सुयोग शिबिर प्रमुख विवेक भावसार, महेश पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

000000