मुंबई दि-05: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली.
आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली. यावेळी त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
000
UP Chief MinisterYogi Adityanath calls on Maha Governor
Mumbai, Jan 5 –Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Yogi Adityanath visited the 19th Century underground British Era Bunker at Raj Bhavan and inspected the Gallery of revolutionaries ‘Kranti Gatha’ created inside the bunker.
Yogi Adityanath offered his respects at the statue of Chhatrapati Shivaji Maharaj installed inside the museum and got himself apprised of the work of various revolutionaries during the Indian freedom movement.
The UP Chief Minister later visited the historic Sri Gundi Devi Mandir located at the cliff of Malabar Point facing the Arabic ocean inside Raj Bhavan and visited the huge statue of Lord Shiva sitting in a meditation posture installed outside the temple recently.
000