विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
10

मुंबई, दि. 5 : विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नाविन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु, गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उपसचिव अजित बाविस्कर,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, शैक्षणिक शुल्क समितीचे अध्यक्ष विजय अचलिया, माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे व सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज आणि सुलभ उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्त्वाची आहे, शैक्षणिक अडचणी आणि त्यावर उपाययोजनांसाठी विद्यापीठ आणि राज्य शासन यांनी समन्वयातून कार्य करावे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

परीक्षा, निकाल आणि शैक्षणिक वेळापत्रक याचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे परीक्षा वेळापत्रक, परिक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठांनी नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा दि. ३१ मे पर्यंत पूर्ण होतील याचे नियोजन करून दि. ३० जून पर्यंत निकाल जाहीर करावेत. जून-जुलैमध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दि. १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करावे. विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करावे.त्यामुळे विद्यार्थ्यांना  राज्याबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल आणि  विद्यार्थ्यांचा मानसिक त्रासही कमी होईल.

विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना पाच वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. त्यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रिया केली नाही. अशा महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेश बंद करण्यात येईल. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अधिकाधिक स्पष्टता आणून येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीला गती द्यावी.

उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी संख्या विशेषत: महिलांची संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सद्य:स्थिती याबाबत सादरीकरण केले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम, पुस्तक, शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये उपलब्ध होण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ‘उडाण’ प्रकल्पाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

0000

Governor, Minister review preparedness of Universities for implementing NEP from coming Academic Year

Vice Chancellors should lead the Universities from the front”: Governor

New Academic Sessions must start from 1 August”: Chandrakant Patil

Mumbai, 5th Jan : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari in his capacity as Chancellor of universities today reviewed the preparedness of traditional public universities for the implementation of the National Education Policy (NEP) 2020 from the academic session for 2022-2023. The meeting of vice chancellors chaired by him also discussed the issues of Uniform Academic Calendar and uniformity in time table of examinations and timely declaration of results as mandated by the Maharashtra Public Universities Act.

The review meeting was attended by Minister of Higher and Technical Education Chandrakant Dada Patil, Principal Secretary Higher and Technical Education Vikas Chandra Rastogi, Chairman of Fee Regulatory Authority Justice (retd) Vijay Achaliya, Chairman of Admission Regulatory Authority J P Dange, Director IIT Bombay Subhasis Chaudhuri and members of the Task Force for the implementation of NEP led by Chairman Dr Nitin Karmalkar.

The Governor said while it is important to conduct examinations, declare results and start new academic sessions as mandated by National Education Policy on time, it is also important for vice chancellors to lead the Universities from the front and shape the character of students. Referring to the vacancies of staff and faculty in universities, he said a way must be found to take the universities forward despite the existing constraints.

Minister Chandrakant Dada Patil asked vice chancellors to conduct all examinations by 31st May, declare results by 30th June and conduct Entrance tests and admissions by 31th July so as to start the new academic session without delay from 1 August.

Stating that the present enrollment in higher education is around 32 lakh, he asked universities to set their own targets for increasing the enrollment in a phased manner so as to attain the enrollment of 50 lakh students. The Minister also called for strengthening the National Service Scheme in colleges and universities by enhancing its ambit and outreach.

The meeting discussed issues such as Development of Learning Management Software for all State Public Universities and use of e- Samarth, Development of Massive Open Online Course (MOOC) in Marathi, Uniformity in Credit equivalence in Universities and Changing of Duration of lectures from 48 minutes to 1 hours in line with the Credit System framework adopted in NEP 2020. The meeting also reviewed the progress of students registration under Academic Bank of Credit and uploading of Mark Sheets and Degree Certificates on DIGI-LOCKER, Traininig of  officials and members of various authorities by MSFDA and recruitment of teaching posts in Non Agricultural Universities.

A memorandum of understanding was signed between IIT Bombay and Government of Maharashtra for the translation of books and resources of Under Graduate and Post Graduate professional and non professional programmes in Marathi language as outlined in NEP 2020. The project ‘Udaan’ is led by IIT Professor Ganesh Ramakrishnan.

0000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here