शिक्षक मतदार संघ निवडणूक: विभागीय आयुक्त कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार

0
13

नागपुर, दि.५: भारत निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार संघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. नागपूर शिक्षक मतदार संघात निवडणुकीसंदर्भात मतदाराला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्‍यास यासाठी  विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

नागपूर विभाग मतदारसंघात निवडणूक संदर्भात मतदाराला कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास किंवा मत मिळविण्यासाठी रोख रक्कम किंवा वस्तु देणे, कोणत्याही प्रकारच्या धमक्या, मताधिकाराच्या मुक्त वापरात बळजबरी करणे, निवडणूक फायद्यासाठी राज्य यंत्रणेचा गैरवापर हात असल्यास  नियंत्रण कक्षाचा 0712-2542518 किवा dycommgadngp@gmail.com यावर संपर्क साधावा किंवा विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे प्रत्यक्ष हजर राहुन तक्रार दाखल करावी. अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here