महाराष्ट्र परिचय केंद्रात पत्रकार दिन साजरा

0
5

नवी दिल्ली, दि. ६ : महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी पत्रकार दिन आज  साजरा करण्यात आला.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी रोजी राज्यात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here