‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक, अभ्यासक निशिकांत भालेराव यांची शुक्रवार व शनिवारी मुलाखत

मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक, अभ्यासक निशिकांत भालेराव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 13 जानेवारी, शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीत श्री. भालेराव यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्ज्वल्य इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर हैद्राबाद संस्थानाचा कारभार, कार्यपद्धती, तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000