दावोस दि. १७ : महाराष्ट्रामध्ये ब्रिटनची गुंतवणूक अधिक व्हावी तसेच परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये ब्रिटनच्या सर्वाधिक खपाच्या दि डेली मेलशी बोलताना सांगितले. या प्रसंगी त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या पायाभूत विकासाच्या कामांविषयी विस्तृत माहिती दिली.
मुंबई ते नागपूर या दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या विषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती देऊन पुढील 2 वर्षाच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या विकास आराखड्याची माहिती दिली.
सिंगापूरच्या माहिती व दूरसंचार मंत्री श्रीमती जोस्फाईन ( Josphine TEO) या देखील मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील सुविधांविषयी चर्चा केली.