‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ : मंत्रालयातील ग्रंथप्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद

मुंबई, दि. २४ : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या या प्रदर्शनात आत्मचरित्रात्मक, ऐतिहासिक,  स्पर्धा परीक्षा यासारख्या विषयांच्या पुस्तकांना तसेच दुर्मिळ, ग्रंथांना मागणी आहे.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे दुपारी दोन वाजता पासून मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात ऐतिहासिक, ललित, आत्मचरित्रात्मक पुस्तकातील उतारे स्पर्धकांनी साभिनय वाचून दाखविले.

उद्या बुधवार, दि. २५ जानेवारी, २०२३ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत दिपाली केळकर यांच्या “हास्यसंजीवनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर  सायंकाळी ०५:३० ते ६ या कालावधीत अभिवाचन स्पर्धेचा बक्षीस समारंभ व कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ