अंबाबाई मंदिरातील वॉटर प्यूरिफायर कुलरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

0
3

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) :- येथील श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर प्युरिफायर कुलर बसविण्यात आलेले आहे. या वॉटर प्युरिफायर कुलरचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मंदिर समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कामत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून  बसवण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायर कुलरचे त्यांनी उद्घाटन केले. यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छतागृहाची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित केले.

                 ***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here