जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी ४७२ कोटी ६६ लाखांचा आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर

0
7

सांगली दि. 29 (जि.मा.का.) :- जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 साठी जिल्ह्याचा 472.66 कोटीचा आराखडा आज राज्यस्तरीय बैठकीत कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. सुरेश खाडे यांनी  सादर केला.  या आराखड्यात 140 कोटी 84 लाखाच्या  अतिरीक्त मागणीचा समावेश आहे. जिल्ह्याने सादर केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यास निधी मिळावाअशी मागणी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत केली. जिल्ह्याच्या मागणीनुसार जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दिला जाईलअसे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-2024 राज्यस्तर बैठक उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडेआमदार सुधीर गाडगीळजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडीपोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेलीजिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले.

राज्यस्तरीय बैठकीत सादर केलेल्या आराखड्यात गाभाक्षेत्रासाठी 186 कोटी 15 लाख 27 हजार  लाखबिगर गाभा क्षेत्रासाठी 93 कोटी 7 लाख 63 हजारनाविण्यपूर्ण व मूल्यमापनसाठी 16 कोटी 59 लाख 10 हजारमुख्यमंत्री ग्रमा सडक योजनेसाठी 36 कोटी अशी 331 कोटी 82 लाखाची  तरतूद करण्यात आली आहे.

सन 2023-2024 आराखड्यात 140.84 कोटीच्या अतिरीक्त मागणीचा समावेश असून यामध्ये   शिक्षण विभाग 33 कोटीरस्ते व दळणवळणसाठी 29 कोटीग्रामीण विकासासाठी 21 कोटी 34 लाखआरोग्यासाठी 15 कोटीउर्जा विभागासाठी 12 कोटीमहिला व बाल कल्याण विभाग 4  कोटी आणि इतर विभागांसाठी 26.50 कोटीच्या मागणीचा समावेश आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील 42 गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रमापंचायत जनसुविधाजिल्हा परिषद शाळांमध्ये सोयी सुविणा निर्माण करणेविद्युत वितरणाची कामेग्रामीण रस्ते विकासपाटबंधारे विभागाची कामांसाठी जादा निधी आवश्यक असून जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिल्याप्रमाणे 140 कोटी 84 लाखाच्या वाढीव निधीसह आराखड्यास मान्यता मिळावीअसे आवाहन  पालकमंत्री डॉ. खाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here