राजधानीत संत गाडगे महाराज जयंती साजरी

0
10

नवी दिल्ली, दि. 20 : सामाजिक अन्यायाविरुध्द लढा देणारे थोर संत आणि समाजसुधारक गाडगे महाराज यांची  जयंती महाराष्ट्र सदन  आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

            कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी  निवासी  आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी  संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  संत गाडगे महाराजांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराज यांना अभिवादन              

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत गाडगे महाराज  यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी संत गाडगे महाराज  यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here